CM Devendra Fadnavis : पक्ष सांगेल तेव्हा दिल्लीत जाईन!

- २०२९ पर्यंत माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती


मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या दिल्लीवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पूर्णविराम दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, माझे नेते २०२९ पर्यंत मला महाराष्ट्रातच ठेवणार असून, माझा पक्ष जेव्हा आदेश देईल, त्याच दिवशी मी दिल्लीला जाईन. मात्र, सद्यस्थितीत अशा प्रकारच्या चर्चा बातमी निर्मितीसाठी केल्या जात असल्याचे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. (CM Devendra Fadnavis)



मागील काही दिवसांपासून फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या दिल्लीतील हालचालींवरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात होते. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, काहींना वाटते की दिल्लीत गेल्यास आपले प्रमोशन होईल, तर काहींना वाटते की 'बला' टळून जाईल. मात्र, कोणाला काहीही वाटले तरी माझे नेते आणि पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसारच पावले उचलली जातील. दरम्यान, महायुतीमधील नेते एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील कथित वादावर बोलताना, "दोघेही मोठे नेते आहेत आणि त्यांच्यात समन्वय साधण्याचे काम माझ्यासारख्या छोट्या नेत्याला करावे लागते," अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली. (CM Devendra Fadnavis)



या मुलाखतीत त्यांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे, संजय राऊत, रोहित पवार यांच्यासह विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, हे सर्व नेते 'पेपर टायगर' असून त्यांना मीडियाच्या बाहेर येऊन प्रभावी विरोध करता येत नाही. माझा स्वतःचा डीएनए विरोधी पक्षाचा असून, विरोध कसा करावा आणि तो जनतेपर्यंत कसा न्यावा, याची शिकवणी मी या नेत्यांना द्यायला तयार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (CM Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Tree Plantation Badlapur : सरकारी प्रकल्पांमधील बाधित झाडांच्या बदल्यात पर्यायी वृक्ष लागवड बदलापुरला...खासगी इमारतींची मुंबईत

सचिन धानजी, मुंबई मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विस्तारीत मुंबई सागरी किनारी रस्ता(मुंबई

Mumbai Fire News: दादरमध्ये हॉटेलच्या किचनमध्ये आग; अग्निशमन दलाकडून तातडीने कारवाई

Mumbai Fire News: मुंबईतील दादर पश्चिम येथे शिवसेना भवनसमोर असलेल्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीतील हॉटेलच्या किचनमध्ये

Salman Khan And Lawrence Bishnoi : सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वैर पुन्हा चर्चेत; 2018 पासूनच्या धमक्या आणि हल्ल्यांचा घटनाक्रम

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर झालेल्या कथित गोळीबारानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे; 3 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर जुहू परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी 3 अज्ञात

Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; आरोपींच्या शोधासाठी मुंबईत नाकाबंदी, बस आणि ट्रेनची तपासणी

Mumbai Crime News: अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहू परिसरात गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपासाला वेग

Tiger Shroff: जुहू गोळीबार प्रकरणानंतर टायगर श्रॉफचा फोटो व्हायरल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

Tiger Shroff : मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर झालेल्या कथित गोळीबाराच्या घटनेनंतर