पुणे : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे PMPMLच्या बससेवेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी बस स्थानके आणि मार्गांचे नियोजन केले आहे. हे बदल 3, 4 आणि 5 सप्टेंबर रोजी लागू राहणार आहेत. (Dahi handi)
5 सप्टेंबर रोजी रस्ते बंद झाल्यानंतर मार्ग क्रमांक 17 (नऱ्हेगाव-शिवाजीनगर) आणि मार्ग क्रमांक 50 (शनिवारवाडा-सिंहगड) या बस सारसबाग येथून सुटणार आहेत. तर मार्ग क्रमांक 113 (अ. ब. चौक-सांगवी) या मार्गावरील बस मनपा नदीकाठ स्थानकावरून धावणार आहेत.
याशिवाय मार्ग क्रमांक 8, 9, 57, 81, 94, 108, 143, 144 आणि 283 या बस डेक्कन जिमखाना, मनपा भवन आणि गाडीतळ (जुना बाजार) मार्गे धावणार आहेत. ( Dahi Handi Festival 2026)
मार्ग क्रमांक 2, 11, 13, 21, 37, 38 तसेच रातराणी-1 या बस पुण्याकडे येताना जे. एम. रोड, डेक्कन आणि टिळक रोडमार्गे धावतील. मात्र, स्वारगेटच्या दिशेने जाताना या बस नेहमीप्रमाणे बाजीराव रोडमार्गे धावणार आहेत.
दरम्यान, मार्ग क्रमांक 7, 68 आणि 202 या बस 3 आणि 4 सप्टेंबर रोजी रस्ते बंद झाल्यानंतर स्वारगेट आणि टिळक रोडमार्गे धावणार आहेत. ( Dahi Handi Festival)
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाची उघडीप कायम; विदर्भ-मराठवाड्यात जोरदार सरींचा अंदाज
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून अनेक भागांत पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी ...





