Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत आठ जण अटकेत, लॅब असिस्टंट साळुंकेला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Shalarth ID Scam : सुमारे १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात रोज नवे खुलासे होत आहेत. धुळ्यातील साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलचा लॅब असिस्टंट तुषारकुमार साळुंके याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik District Court) त्याला ७ सप्टेंबरपर्यंत म्हणजेच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासानुसार, संगणकीय ज्ञानाचा गैरवापर करत साळुंकेने संस्थाचालक आणि संशयित मध्यस्थ प्रशांत वाडीले याच्यासोबत संगनमत करून विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार निष्पन्न झाले आहे. बनावट मान्यता आणि आदेश मिळवण्यासाठी तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक अधिकाऱ्यांशी आर्थिक व्यवहार झाल्याचेही तपासात समोर आले आहे.



जावक रजिस्टरमध्ये खाडाखोड करून बनावट आदेश


तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, तुषार साळुंके याला संगणकाचे ज्ञान असल्याने त्याने या घोटाळ्यात मुख्य तांत्रिक सूत्रधाराची भूमिका बजावली. त्याने शिक्षण संस्था चालक व संशयित मध्यस्थ प्रशांत वाडीले याच्याशी संगनमत करून तब्बल पाच ते सहा शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर शालार्थ आयडी तयार केले. या बनावट वैयक्तिक मान्यता आणि आदेश मिळवण्यासाठी साळुंकेने तत्कालीन शिक्षणाधिकारी संशयित प्रविण अहिरे आणि वेतन पथक अधीक्षक मीनाक्षी गिरी यांच्याशी आर्थिक व्यवहार केले.


धुळे जिल्हा परिषदेच्या जावक रजिस्टरमध्ये खाडाखोड करून बनावट (Fake) आदेश घुसवण्यात आले आणि शिक्षण विभागाची दिशाभूल करून शासनाचा करोडो रुपयांचा निधी लाटण्यात आला. साळुंके आणि त्याच्या साथीदारांनी धुळे व शिरपूर येथे विविध शाळांमध्ये बेकायदेशीर मान्यता मिळवून दिल्याचे समाेर आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे आणि वेतन पथक अधीक्षक मीनाक्षी गिरी हे गेल्या चार महिन्यांपासून फरार आहेत. साळुंकेच्या चौकशीतून या दोघांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.



शालार्थ आयडी घोटाळ्यात आठवी अटक


या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक झाली आहे. ​नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) मार्च २०२६ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात नाशिक विभागातील एकूण ८४१ कर्मचाऱ्यांचे आयडी बनावट आढळले असून, त्यापैकी ६३८ कर्मचारी हे एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. याप्रकरणी आतापर्यंत राज्य शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त अध्यक्ष नितीन उपासनी, किरण पाटील, राहुल पवार, संस्थाचालक प्रशांत वाडीले, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, भाजप पदाधिकारी संजय गरूड व दीपक गरूड यांना अटक झाली आहे. साळुंके हा या गुन्ह्यातील आठवा संशयित आहे. सध्या एसआयटीकडून साळुंकेची कसून चौकशी सुरू असून, त्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचाही तपास केला जात आहे

Comments
Add Comment

China Masters : किदाम्बी श्रीकांतची आगेकूच कायम, तन्वी शर्माचे आव्हान संपुष्टात

शेन्झेन (चीन) : किदाम्बी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या व्हिक्टर लाईला पराभूत करत चायना

ICC Women's Champions Trophy 2027 : पहिली आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात होणार

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले की, पहिली आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ ही

CM Devendra Fadnavis : पक्ष सांगेल तेव्हा दिल्लीत जाईन!

- २०२९ पर्यंत माझे नेते मला महाराष्ट्रातच ठेवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती मुंबई :

Amravati Crime : अमरावतीत १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भरचौकात चाकूने हत्या; एकतर्फी प्रेमातून हत्याकांडाचा संशय

अमरावती : अमरावतीमध्ये एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना

FDA Festive Calendar : सण-उत्सवात अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी 'एफडीए'कडून वार्षिक कॅलेंडर

सर्व धर्मीयांच्या महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘स्थायी आदेश’ जारी मुंबई :

Ahilyanagar Crime : धक्कादायक ! विहिरीत आढळले युवक-युवतीचे मृतदेह

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कर्जत तालुक्यातील खुरंगेवाडी