वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या होर्मुझच्या सामुद्रधुनीचे (Strait of Hormuz) नाव बदलून ‘ट्रम्प स्ट्रेट’ ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social वर ही सूचना मांडताना, सध्या ही सामुद्रधुनी अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असल्याचा दावा केला. (Trump Strait Hormuz)
ट्रम्प यांनी पोस्टमध्ये विचारले की, अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असल्याने ‘Hormuz Strait’चे नाव ‘Trump Strait’ का ठेवू नये? त्यांच्या या वक्तव्यानंतर या प्रस्तावाची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. (Trump Strait Hormuz)
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे माजी ग्रुप कॅप्टन आणि वीर चक्र विजेते अभिनंदन वर्धमान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 2019 मध्ये पाकिस्तानच्या F-16 लढाऊ ...
व्हाईट हाऊसकडूनही ‘ट्रम्प स्ट्रेट’चा नकाशा :
ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर व्हाईट हाऊसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पर्शियन आखाताचा एक नकाशा शेअर करण्यात आला. या नकाशात होर्मुझच्या सामुद्रधुनीला ‘Trump Strait’ असे संबोधण्यात आले. व्हाईट हाऊसने या नावावर प्रतिक्रिया देताना, या नावाला ‘चांगला रिंग’ असल्याचे म्हटले. मात्र, होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकेचा भूभाग नाही. ही सामुद्रधुनी इराण आणि ओमानदरम्यान असून आंतरराष्ट्रीय नौवहनासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एकतर्फीपणे या आंतरराष्ट्रीय जलमार्गाचे नाव बदलू शकतील का, यावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Trump Strait Hormuz)
मुंबई : नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे अनेक जण बेपत्ता झाल्याने महाराष्ट्रातील कुटुंबांची चिंता वाढली आहे. बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेणे, ...
ट्रम्प यांच्या नामकरणाच्या मोहिमेची चर्चा :
ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्याची तुलना त्यांच्या यापूर्वीच्या भौगोलिक नामकरणाच्या निर्णयांशी केली जात आहे. त्यांच्या प्रशासनाने Gulf of Mexico साठी ‘Gulf of America’ हे नाव वापरण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कॅनडासोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर Lake Ontario चे ‘Lake America’ असे नामकरण करण्याचा आदेशही देण्यात आला. (Trump Strait Hormuz)
विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी यापूर्वीही होर्मुझच्या सामुद्रधुनीला ‘Strait of Trump’ म्हणण्याचा उल्लेख केला होता. मात्र, यावेळी त्यांनी थेट ‘Trump Strait’ असे नाव सुचवले आहे. दरम्यान, इराण आणि अमेरिकेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी आधीच तणावाचे प्रमुख केंद्र बनली आहे. या जलमार्गातून जागतिक तेल वाहतुकीचा मोठा हिस्सा जात असल्याने येथील कोणत्याही घडामोडीचा परिणाम आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारावर होऊ शकतो. (Trump Strait Hormuz)




