पुणे : पुण्यातील ‘डीजे मुक्त गणेशोत्सवा’साठी आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांच्यावर एका तरुणाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना तरुणांच्या एका गटाने बापट यांच्यावर अचानक हल्ला केला. या घटनेनंतर विद्यानंद बापट यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Vidyanand Bapat Attack)
विद्यानंद बापट यांनी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही आणि इतर फुटेज ताब्यात घेऊन हल्लेखोराला अटक करावी, अशी मागणी केली. तसेच संतापाच्या भरात त्यांनी हल्लेखोराला पोलिसांनी चौकीत नेऊन ‘तुडवावं’, अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, कायदा हातात न घेता पोलिसांनी या प्रकरणात नियमानुसार कारवाई करणे अपेक्षित आहे. (Vidyanand Bapat Attack)
‘तू आमच्या गणेशोत्सवाला विरोध करतोस’ म्हणत हल्ला :
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यानंद बापट हे त्यांच्या निवासस्थानाजवळ एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. त्यावेळी तरुणांचा एक गट तेथे आला. यातील एका तरुणाने आक्रमक होत बापट यांच्यावर हल्ला केला. (Vidyanand Bapat Attack)
अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ रेल्वे स्थानकातून सुरक्षेच्या चिंतेत भर घालणारी एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. वॉकरच्या साहाय्याने थेट ...
‘तू आमच्या गणेशोत्सवाला विरोध करतोस’, ‘हिंदूंच्या सणाला तू विरोध करतोस’, अशा शब्दांत संबंधित तरुणाने बापट यांच्याशी वाद घातल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्याने बापट यांच्यावर हात उचलला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती चिघळली आणि बापट यांच्यावर पुन्हा मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. (Vidyanand Bapat Attack)
‘सवंग प्रसिद्धीसाठी हल्ला’ :
हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना विद्यानंद बापट यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. अचानक एक व्यक्ती आली आणि माझ्यावर हल्ला केला. त्याला केवळ सवंग प्रसिद्धी हवी होती, असे बापट यांनी म्हटले. यावेळी त्यांनी संस्कृतमधील एका उक्तीचा संदर्भ देत संबंधित व्यक्ती प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, असा टोला लगावला. (Vidyanand Bapat Attack)
‘फुटेजच्या आधारे कारवाई करा’ :
या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्याचे आणि तक्रार केल्याचे विद्यानंद बापट यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरील फुटेज ताब्यात घेऊन हल्लेखोरावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी संतापाच्या भरात बापट यांनी, ‘पोलिसांनी त्याला चौकीत घेऊन तुडवा, त्याला समजलं पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी ‘मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने दिलं पाहिजे, पण झोंबीसोबत युक्तिवाद होतो का?’ असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला. (Vidyanand Bapat Attack)
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत अवोकॅडो या फळाची लोकप्रियता भारतात झपाट्याने वाढताना दिसत आहे. टोस्ट, डिप्स तसेच विविध पदार्थांमध्ये अवोकॅडोचा वापर ...
डीजेविरोधातील भूमिकेमुळे चर्चेत :
विद्यानंद बापट हे गेल्या काही काळापासून पुण्यातील डीजेच्या वापराविरोधात भूमिका मांडत आहेत. गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण आणि डीजेच्या वापरावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या तार्किक मांडणीसह अस्खलित आणि शुद्ध मराठी भाषणशैलीमुळे ते सोशल मीडियावरही चर्चेत आले आहेत. (Vidyanand Bapat Attack)
कोण आहेत विद्यानंद बापट?
विद्यानंद बापट हे ३७ वर्षीय असून बीपीओ क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे बहुतांश काम घरूनच सुरू असते. मूळचे रत्नागिरीचे असलेले बापट गेल्या आठ वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. पुण्यातील विविध पुरोगामी संघटनांच्या उपक्रमांमध्येही ते सक्रियपणे सहभागी होत असल्याची माहिती आहे. कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही डीजेविरोधातील त्यांच्या भूमिकेमुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. (Vidyanand Bapat Attack)






