Dr. Shobha Bachhav : ‘Help Me’, 'माझ्या खात्यात 62 हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन', काँग्रेस खासदाराच्या नंबरवरून मेसेज गेला अन्...

Dr. Shobha Bachhav's mobile hacked : धुळे लोकसभा मतदारसंघाच्या (Dhule Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव (MP Shobha Bachhav) यांचा मोबाईल हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर भामट्यांनी कुरिअरच्या बहाण्याने लिंक पाठवून खासदारांचा फोन हॅक केला आणि त्यांच्या व्हॉट्सॲपवरून परिचितांकडे ६२ हजार रुपयांची मागणी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.. याप्रकरणी सायबर पोलीसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.



तुमचे कुरिअर आले आहे, मात्र...


याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल त्यांच्याकडे नसून त्यांचा पीएकडे होता. त्याचवेळी एका व्यक्तीचा फोन त्यांच्या फोनवर आला. ‘तुमचे कुरिअर आले आहे, मात्र पत्ता सापडत नाही. तुम्हाला एक लिंक पाठवली आहे, ती तपासा,’ असे सांगत पीएचा विश्वास संपादन करत जाळ्यात ओढले. यानंतर पीएने मेसेजमधील लिंक उघडताच काही वेळातच मोबाईल हॅक झाल्याचा प्रकार समोर आला. मोबाईल हॅक झाल्यानंतर सायबर फसवणूक करणाऱ्यांनी खासदारांच्या नावाने त्यांच्या संपर्कातील अनेक व्यक्तींना मेसेज पाठवून मदतीची आणि पैशांची मागणी सुरू केली.



‘62 हजार रुपये पाठवा, दोन तासांत परत करेन’


मोबाईल हॅक होताच भामट्यांनी खासदारांच्या व्हॉट्सॲप कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना ‘Help Me’ आणि ‘माझ्या खात्यात ६२ हजार रुपये जमा करा, दोन तासांत परत करतो’ असे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. यानंतर डॉ. शोभा बच्छाव यांना आपला मोबाईल हॅक झाल्याचा प्रकार लक्षात आला. मोबाईल हॅक झाल्याचे समजताच खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तांत्रिक तपास सुरू केला आणि काही वेळाच्या प्रयत्नांनंतर डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल पुन्हा सुरक्षित करण्यात सायबर पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली आहे.



नागरिकांना सावधगिरीचे आवाहन


या घटनेमुळे पुन्हा एकदा सायबर फसवणुकीचा धोका अधोरेखित झाला आहे. कुरिअर, बँक, सरकारी संस्था किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने येणारे संशयास्पद फोन, मेसेज किंवा लिंक याबाबत नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. कुरिअर, बँक किंवा कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या लिंकवर चुकूनही क्लिक करू नका. पैशांची (Money) मागणी करणारे मेसेज आल्यास आधी संबंधित व्यक्तीशी खात्री करा, असे आवाहन खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केले आहे. दरम्यान या प्रकरणात मोबाईल हॅक करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा

Nashik Crime : सद्दाम शेखच्या अडचणी वाढल्या ! अपहरण, मारहाण आणि ५० लाखांच्या खंडणीचा दुसरा गंभीर गुन्हा दाखल

Nashik Crime : नाशिकमध्ये पोलिसांवर आरोप करून चर्चेत आलेल्या संशयित सद्दाम शेखच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. जमिनीवर

google gemini 3 8 flash : गूगलचा सर्वात मोठा धमाका! 'Gemini 3.8 Flash' लाँच; कोडिंग स्पीड पाहून जग चक्रावले

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील तीव्र स्पर्धेत गूगलने आपले स्थान पुन्हा भक्कम केले आहे. OpenAI आणि

Ashwini Paul : स्वतः राष्ट्रीय कुस्तीपटू, MSF मध्ये नोकरी अन् नवरा मात्र...अश्विनी पौळ यांच्या निर्णयामागील 'ते' मोठे कारण आले समोर

धाराशिव : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत वेदनादायी घटना धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग

Rojgar Mahakumbh : मुंबईत २९ सप्टेंबरला रोजगाराचा 'महाकुंभ'; पंडित दीनदयाळ उपाध्याय 'रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र' अंतर्गत शहरात १० ठिकाणी भव्य मेळावे

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई

Nashik : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा दणका ! १४ बँक खाती गोठवली

Nashik : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Agricultural Produce Market Committee) अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत. जमीन संपादनाच्या