google gemini 3 8 flash : गूगलचा सर्वात मोठा धमाका! 'Gemini 3.8 Flash' लाँच; कोडिंग स्पीड पाहून जग चक्रावले
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील तीव्र स्पर्धेत गूगलने आपले स्थान पुन्हा भक्कम केले आहे. OpenAI आणि अँथ्रॉपिकसारख्या बलाढ्य कंपन्यांशी दोन हात ...
मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न
फिर्यादीनुसार, २०२१ पासून सद्दाम बाबू शेख आणि त्याची आई लता बर्डे हे बेकायदेशीरपणे सावकारीचा व्यवसाय करत असल्याचा आरोप आहे. शिरोडे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सद्दाम आणि त्याच्या आईकडून २० लाख रुपये घेतले होते. मात्र, या २० लाख रुपयांच्या मुद्दलावर तब्बल ४८ लाख रुपये व्याज म्हणून वसूल करण्यात आले. एवढी रक्कम दिल्यानंतरही पैशांची मागणी सुरूच असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. काही दिवसांपूर्वी शिरोडे यांना भगवती हॉटेल परिसरात बोलावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी त्यांना मारहाण करून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यानंतर शिरोडे यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवण्यात आले आणि अमृतधाम परिसरातील गोल्डस्टार कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे तब्बल चार तास डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. यावेळी मुद्दल आणि व्याजाची रक्कम अद्याप बाकी असल्याचे सांगत शिरोडे यांच्याकडे आणखी ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. पैसे न दिल्यास शिरोडे आणि त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
Ashwini Paul : स्वतः राष्ट्रीय कुस्तीपटू, MSF मध्ये नोकरी अन् नवरा मात्र...अश्विनी पौळ यांच्या निर्णयामागील 'ते' मोठे कारण आले समोर
धाराशिव : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत वेदनादायी घटना धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर घडली आहे. कौटुंबिक कलह आणि ...
ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी
मात्र, प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही.शिरोडे यांच्या मालकीच्या सर्व्हे क्रमांक २६१/२ मधील प्लॉटच्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवर जबरदस्तीने सह्या करून घेतल्याचा आरोपही सद्दाम शेख आणि लता बर्डे यांच्यावर करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, भीतीचे वातावरण निर्माण करून संबंधित कागदपत्रांवर सह्या करून घेण्यात आल्या आणि त्यानंतर प्लॉटवर बेकायदेशीर ताबा मिळवण्यात आला. याशिवाय, हा प्लॉट ताब्यात घेण्यास विरोध केल्यास सद्दाम शेखच्या सांगण्यावरून खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक कैलास जाधव पुढील तपास करत आहेत.
Rojgar Mahakumbh : मुंबईत २९ सप्टेंबरला रोजगाराचा 'महाकुंभ'; पंडित दीनदयाळ उपाध्याय 'रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र' अंतर्गत शहरात १० ठिकाणी भव्य मेळावे
मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात 'पंडित दीनदयाळ उपाध्याय ...



