Nashik News : जिल्हा परिषदेच्या गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी १५ शिक्षकांची निवड, ४३ प्रस्तावांतून उत्कृष्ट कार्याची दखल

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik Zilla Parishad) वतीने दरवर्षी गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०२६ च्या गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून एकूण १५ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.



४३ प्रस्तावांतून उत्कृष्ट कार्याची दखल


या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून एकूण ४३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांमध्ये शिक्षकांनी केलेल्या गुणवत्ता विषयक कामकाजाची तसेच शाळा आणि वर्गस्तरावर राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. शिक्षकांनी प्रस्तावात नमूद केलेले उपक्रम प्रत्यक्षात शाळेत कितपत प्रभावीपणे राबविले जात आहेत, विद्यार्थ्यांना त्याचा किती फायदा होत आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत त्याचा काय परिणाम झाला आहे, याची पाहणी करण्यात आली. यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांचे गट बदलून प्रत्यक्ष मूल्यांकनाची कार्यवाही करण्यात आली.


यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेले गुणांकन, शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता, कामकाजातील नाविन्यता, राबविण्यात आलेले शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी केलेले योगदान तसेच इतर निर्धारित निकषांचा विचार करण्यात आला.या सर्व बाबींच्या आधारे जिल्हास्तरीय निवड समितीने एकूण १५ शिक्षकांची सन २०२६ च्या गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी सर्वानुमते निवड केली आहे. या निवडीला विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनीही मान्यता दिली आहे.



जिल्ह्यातील शिक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन


दरम्यान, गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व १५ शिक्षकांचे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी केलेले योगदान तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याबद्दल त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले.या पुरस्काराच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याला प्रोत्साहन मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव होणार आहे.



सन २०२६ च्या गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेले शिक्षक :


बागलाण – माधुरी सुभाष पवार, प्राथमिक शिक्षिका, जि.प. शाळा अजमीर सौंदाणे


चांदवड – सतीश भाऊसाहेब अहिरे, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा काजीसांगवी


देवळा – सतीश गोविंदराव आहेर, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा आहेरवस्ती


दिंडोरी – भिलाजी माधवराव पाटील, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा उमराळे खुर्द


इगतपुरी – अवधुत रामदास खाडगीर, पदवीधर शिक्षक, जि.प. शाळा भरविर खुर्द


कळवण – सविता तानाजी भामरे, प्राथमिक शिक्षिका, जि.प. शाळा कळवण मुली नं. १


मालेगाव – मीना निषा देवरे, प्राथमिक शिक्षिका, जि.प. शाळा सौंदाणे नं. १


नांदगाव – गणेश पुंडलिक साळी, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा गंगाधरी मोठी


नाशिक – विवेक पुंडलिक खैरनार, पदवीधर शिक्षक, जि.प. शाळा महादेवपूर


निफाड – गौरी राजेंद्र गायवन, प्राथमिक शिक्षिका, जि.प. शाळा तळेगाव वाट


पेठ – योगेंद्र गणपत बोरसे, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा दोनवाडे


सिन्नर – प्रकाश दत्तु जगताप, मुख्याध्यापक, जि.प. शाळा धोंडबार


सुरगाणा – सुधाकर कृष्णा भोये, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा सुरगाणा नं. १


त्र्यंबकेश्वर – संदीप दत्तात्रय गुंजाळ, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा वाघेरा


येवला – योगेश बाळासाहेब माकोणे, प्राथमिक शिक्षक, जि.प. शाळा दुगलगाव


अशा प्रकारे नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून एका-एका शिक्षकाची गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या या शिक्षकांच्या कार्याचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गौरव करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

नेपाळ महापूर : चिखलात अडकलेल्या जिवांना वाचवण्यासाठी ५०० तज्ज्ञांचा व्हॉट्सॲप ग्रुप ठरतोय 'संजीवनी'!

नेपाळमधील त्रिशुली खोऱ्यात निसर्गाने घडवून आणलेल्या भीषण विनाशकानंतर एकीकडे सर्व यंत्रणा हतबल झाल्याचे दिसत

swami vivekanand vidyamandir news : स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात लिओ क्लबची स्थापना! विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांना मिळणार वाव

वाडा : वार्ताहर  विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवून

Dhule : विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीला मालमोटारीची समोरासमोर धडक, तब्बल ३० विद्यार्थी जखमी

Dhule : धुळ्यातून एक मोठी अपघाताची बातमी समोर आली आहे. मानव विकास योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या

Nashik : विसापूर आश्रमशाळेतील ८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, पालकांकडून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आरोप

Nashik : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातुन खळबळजनक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील विसापूर येथील शासकीय

Pratap Sarnaik : स्क्रॅप रिक्षा रस्त्यावर दिसता कामा नये; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवा, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कडक कारवाई करा

मुंबई : नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा

Nashik Crime : सद्दाम शेखच्या अडचणी वाढल्या ! अपहरण, मारहाण आणि ५० लाखांच्या खंडणीचा दुसरा गंभीर गुन्हा दाखल

Nashik Crime : नाशिकमध्ये पोलिसांवर आरोप करून चर्चेत आलेल्या संशयित सद्दाम शेखच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत. जमिनीवर