Irina Rudakova : 'मुंबईतील हे वर्तन थांबले पाहिजे'; ऑटो चालकाला धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी बिग बॉस फेम इरिना रुडाकोव्हा आक्रमक  



Mumbai : 'बिग बॉस मराठी ५' फेम आणि रशियन मॉडेल-अभिनेत्री इरिना रुडाकोव्हा (इरिना राय) हिने मुंबईतील एका रस्त्यावरील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रवासादरम्यान एका कार चालकाने तिच्या ऑटोरिक्षा चालकाला विनाकारण शिवीगाळ करत त्याची कॉलर पकडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे मुंबईतील रस्त्यावरील अरेरावीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



इरिनाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे दिसून येत आहे. एका कारमधून खाली उतरलेला तरुण व्यक्ती कोणत्याही मोठ्या कारणाशिवाय ऑटोरिक्षा चालकाला अत्यंत अरेरावीत बाहेर खेचताना आणि मारहाण करण्याची भाषा करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, ऑटोरिक्षा चालकाने कोणतीही चूक नसताना आणि गाडीला साधा ओरखडाही लागलेला नसताना तो सतत हात जोडून माफी मागताना दिसत होता.





या प्रकारावर संताप व्यक्त करत इरिनाने म्हटले की, "मुंबईतील हे वर्तन अजिबात सहन करण्यासारखे नाही, हे ताबडतोब थांबले पाहिजे." तसेच, काही लोकांकडे पैसा आणि ताकद आहे म्हणून ते सर्वसामान्य लोकांवर अशी अरेरावी करू शकत नाहीत, असे सांगत तिने कार चालकाच्या मुजोरीचा निषेध केला.



इरिनाने या घटनेचा व्हिडिओ आणि संबंधित कार व ऑटोरिक्षाचे नंबर प्लेट रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तसेच नागरिकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन करत तिने मुंबई पोलिसांकडे याप्रकरणी कारवाईची आणि मदतीची मागणी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि कामगारांना अशा प्रकारे नाहक त्रास देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी आता नेटकऱ्यांकडूनही केली जात आहे.   







Comments
Add Comment

Radhika Bhide : राधिका भिडेच्या आवाजाची पुन्हा जादू; गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवं गाणं रिलीज

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) रंगात

Mithun Chakraborty : वयाच्या ७२व्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मिथुन चक्रवर्तींचा मोठा कमबॅक

मुंबई : बॉलिवूडमध्ये काही असे तारे आहेत, ज्यांची ओळख फक्त त्यांच्या हिट चित्रपटांमुळे नाही, तर त्यांच्या दीर्घ

The Traitors Season 2 : 'द ट्रेटर्स सीझन २' चा महाअंतिम सामना : करण जोहरच्या शोचा फायनल एपिसोड आज रात्री; विजेता कोण ठरणार ?

विश्वास, रणनीती आणि विश्वासाघाताने भरलेला 'द ट्रेटर्स' (The Traitors) या लोकप्रिय रिएलिटी शोचा दुसरा सीझन आता अंतिम

Hanuman Ansh Global Release : भारतात धुमाकूळ घातल्यानंतर ‘हनुमान अंश’ आता जगभरात पोहोचणार; 11 सप्टेंबरला ग्लोबल रिलीज

भारतीय चित्रपटगृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळवल्यानंतर ‘हनुमान अंश’ हा हिंदी भक्तिपर चित्रपट आता जगभरातील

Charu Asopa : 'मला त्याच्या बॅगेत कंडोम सापडले'; टीव्ही अभिनेत्रीचा नवऱ्यावर गंभीर आरोप

Charu Asopa : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन यांच्या वैवाहिक नात्याची पुन्हा एकदा चर्चा

3 Idiots Sequel : '3 इडियट्स'चे त्रिकुट परतणार; राजकुमार हिरानींचे संकेत

मुंबई : आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांची मुख्य भूमिका असलेला २००९ मधील सुपरहिट चित्रपट '3 इडियट्स'च्या