नवी दिल्ली : हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील हथनीकुंड बॅरेज येथे सराव सुरू असताना एक अपघात झाला. या अपघातामुळे यमुनेच्या प्रवाहात वाहून गेल्याने भारतीय लष्कराच्या विशेष दलातील (१ पॅरा) दोन जवान शहीद झाले.
मुंबई : ॲपल कंपनी बुधवार नऊ सप्टेंबर रोजी आयफोन १८ प्रो, आयफोन १८ प्रो मॅक्स आणि आयफोन फोल्ड हे तीन नवे मोबाईल लाँच करणार आहे. आयफोन फोल्ड हा आयफोन ...
लष्कराच्या १ पॅरा एसएफमधील पाच जवानांचे एक पथक यमुना नदीत नांगरलेल्या लष्करी बोटीवर चिनूक हेलिकॉप्टरमधून उडी मारून मदतकार्याचा सराव करणार होते. पण आयत्यावेळी इंजिन बिघडले आणि बोट उलटली. यामुळे दोन जवान यमुनेच्या प्रवाहात वाहून गेले. तातडीने शोध मोहीम राबवून वाहून गेलेल्या जवानांचे मृतदेह शोधण्यात आले.
Dhule : धुळ्यातून एक मोठी अपघाताची बातमी समोर आली आहे. मानव विकास योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या ...
एका जवानाचा मृतदेह प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुनेत उत्तर प्रदेश सीमेजवळ सापडला तर दुसऱ्याचा मृतदेह जींद जिल्ह्यात हांसी शाखेत कालव्यात मिळाला. एसडीआरएफ, सैन्याची पथके तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांनी संयुक्तपणे शोध घेऊन वाहून गेलेल्या दोन्ही जवानांचे मृतदेह शोधले. वाहून गेलेल्या दोन जवानांपैकी शहीद नायक अजय कुमार जम्मू कश्मीरच्या अखनूरमधील राखी मुट्ठी भागातील रहिवासी होते. त्यांच्यावर सैन्य इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.