Saturday, September 5, 2026

Navratri 2026 : नवरात्रीच्या गरब्यात मुस्लिमांना प्रवेशबंदी

Navratri 2026 : नवरात्रीच्या गरब्यात मुस्लिमांना प्रवेशबंदी

- विश्व हिंदू परिषदेची नियमावली जाहीर; हिंदूंना प्रवेशासाठी टिळा बंधनकारक करण्याच्या सूचना

मुंबई : महाराष्ट्रात नवरात्री उत्सवादरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये बिगर-हिंदू व्यक्तींना, विशेषतः मुस्लिमांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय विश्व हिंदू परिषदेने घेतला आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आयोजकांसाठी नियमावली जाहीर करताना परिषदेने हा पवित्रा घेतला असून, उपस्थितांची ओळख पटवण्यासाठी व हिंदू संस्कृतीचे पावित्र्य टिकवण्यासाठी कपाळावर टिळा लावणे बंधनकारक करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ( Navratri 2026)

विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि सहसचिव श्रीराज नायर यांनी याविषयी माध्यमांशी बोलताना सांगितले की, नवरात्री हा सण नाच-गाण्यापुरता मर्यादीत नसून, ती देवीची उपासना आहे. मूर्तीपूजेच्या विरोधात असलेल्या मुस्लिमांनी अशा धार्मिक व सांस्कृतिक महोत्सवांमध्ये का सहभागी व्हावे? हा उत्सव हिंदूंच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असल्याने त्याचे महत्त्व कमी होऊ दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ( Dandiya 2026)

या नियमावलीनुसार, नवरात्री उत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांची ओळख पटवण्यासाठी प्रवेशद्वारावर सुरक्षा व पडताळणी मोहीम राबवली जावी, अशी सूचना करण्यात आली आहे. यात हिंदू उपस्थितांसाठी ओळख पटवून देण्याकरिता कपाळावर टिळा लावणे किंवा तत्सम नियम पाळण्याचे आवाहन आयोजकांना करण्यात आले आहे. हा निर्णय कोणत्याही विशिष्ट समुदायाविरोधातील रोषातून नव्हे, तर सांस्कृतिक पावित्र्य आणि सुरक्षेच्या खबरदारीचा उपाय म्हणून घेतला असल्याचे विश्व हिंदू परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >