Saturday, September 5, 2026

मनोरंजन विश्वात खळबळ ! प्रसिद्ध गायकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह ; हत्येचा संशय, तपास सुरू

मनोरंजन विश्वात खळबळ ! प्रसिद्ध गायकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह ; हत्येचा संशय, तपास सुरू

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायकाचा कुजलेल्या अवस्थेत घरातच मृतदेह आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ उडालीआहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गायकाचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वीच झालाय गायकाच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी अधिकाऱ्यांना याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. लुधियाना जिल्ह्यातील सुधार पट्टी धालीवाल गावात पंजाबी गायक आणि लेखक बलजीत सिंग (Punjabi singer and writer Baljit Singh) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आलाय. गुरुवारी ही घटना उघडकीस आलीय.

घरातून दुर्गंधी येताच शेजाऱ्यांना संशय

मिळालेल्या माहितीनुसार, बलजीत सिंग( Baljit Singh) हे घरात एकटेच राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क झाला नव्हता. दरम्यान, त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घराचा दरवाजा तोडल्यानंतर गायकाचा मृतदेह बेडवर आढळून आला. घरातील काही ठिकाणी रक्ताचे डागही आढळल्याची माहिती आहे. मृतदेहाची अवस्था पाहता त्यांचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार

या घटनेनंतर पोलिसांनी घर आणि परिसराची कसून तपासणी सुरू केली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. बलजीत सिंग यांच्या बेपत्ता असलेल्या दिवसांतील हालचालींचा मागोवा घेतला जात असून, त्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. गायकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक वैद्यकीय अहवालात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी सध्या घातपाताची शक्यता नाकारली असली, तरी मृतदेह ज्या परिस्थितीत आढळून आला, त्या पार्श्वभूमीवर सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

काही दिवसांपूर्वी हरियाणवी गायकाचीही हत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हरियाणवी गायक अंकित बालियान (Haryanvi singer Ankit Balyan) यांच्या हत्येनेही खळबळ उडाली होती. शामली येथे जिमबाहेर पडत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अल्पावधीतच दोन गायकांच्या मृत्यूच्या घटनांमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >