Saturday, September 5, 2026

Pune News : पुण्यात दहीहंडीचा सांगाडा काढताना भीषण अपघात; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Pune News : पुण्यात दहीहंडीचा सांगाडा काढताना भीषण अपघात; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

पुणे : पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत लोखंडी स्ट्रक्चरचा अवजड भाग डोक्यावर पडल्याने ४५ वर्षीय सलमा सलाउद्दीन पठाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दहीहंडीचा कार्यक्रम करताना मोठी दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे ११ वाजता मंडळाचे कार्यकर्ते लोखंडी सांगाडा खाली उतरवत होते. त्यावेळी स्ट्रक्चरचा एक अवजड भाग अचानक खाली पडला आणि सलमा पठाण यांच्या डोक्यावर आदळला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते

विशेष म्हणजे, सलमा पठाण यांचा मुलगा याच दहीहंडी मंडळात सक्रिय कार्यकर्ता आहे. त्यामुळे या घटनेने पठाण कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुलाचा मंडळाशी संबंध असल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

मात्र, घटना गंभीर असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत स्वतःहून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या दुर्घटनेमुळे जुन्या सांगवी परिसरात शोककळा पसरली आहे. आज सर्वत्र दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >