मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ आता आपल्या २०वा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सलमान खान पुन्हा एकदा शोचा होस्ट असणार असून, यंदाच्या सीझनमधील स्पर्धक कोण असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमियर ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.
शो सुरू होण्याआधीच संभाव्य आणि निश्चित स्पर्धकांची नावं चर्चेत आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माही विज, कुशल तंवर उर्फ गुल्लू, अर्शिफा खान, कनिका मान, ईशा रिखी आणि काझी तौकीर या नावांचा समावेश निश्चित स्पर्धकांच्या यादीत असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. (Bigg Boss 20 Contestants List)
मुंबई : कोणताही बॉलिवूड सुपरस्टार नसतानाही ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ७ ऑगस्ट रोजी ...
याशिवाय फैसल खान, शोविक चक्रवर्ती, ऋती तिवारी, नितेश राजपूत आणि रोहेद खान यांसारखी नावंही चर्चेत आहेत. मात्र, सर्वच नावांबाबत निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे अंतिम यादीसाठी ग्रँड प्रीमियरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ईशा रिखीच्या नावाची विशेष चर्चा
पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी हिच्या नावाचीही विशेष चर्चा आहे. ‘बिग बॉस 20’च्या एका प्रोमोमध्ये ती भावूक झालेली दिसल्याने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, प्रोमोमधील संदर्भावरून करण्यात येणारे अंदाज आणि प्रत्यक्ष शोमधील माहिती यामध्ये फरक आहे.(Bigg Boss 20 Contestants List)
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कामगिरीने कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शिक्षक दिनानिमित्त ...
६ सप्टेंबरला ग्रँड प्रीमियर
सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमियर ६ सप्टेंबर रोजी होणार आहे. शो JioHotstar वर रात्री ९ वाजता, तर Colors TV वर रात्री १०.३० वाजता पाहता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता या सीझनमध्ये नेमके कोणते चेहरे ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करणार आणि घरातील पहिल्याच दिवसापासून कोणते वाद रंगणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. (Bigg Boss 20 Contestants List)