Nashik : नाशिक जिल्ह्यातील १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, आतापर्यंत १५४ परवाने निलंबित

Nashik : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या आणखी १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण १५४ परवाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.



आतापर्यंत १५४ परवाने निलंबित


तपासणीदरम्यान ई-पॉस मशीनमध्ये अनियमितता, दर व साठा फलक अद्ययावत नसणे, अभिलेखे व्यवस्थित न ठेवणे, एन फॉर्ममध्ये साठा रजिस्टर नसणे आणि शेतकऱ्यांना पावती न देणे आदी त्रुटी आढळल्या. संबंधितांना नोटीस बजावून सुनावणी घेण्यात आल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.९ एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत खतांचे १०८, बियाण्यांचे २६ आणि कीटकनाशकांचे २०, असे एकूण १५४ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच ५२ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.



परवान्यांवर सर्वाधिक कारवाई करणारा जिल्हा म्हणून नाशिक जिल्हा ठरला आहे. निकृष्ट दर्जाच्या किंवा जादा दराने कृषी निविष्ठांची विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कृषी सेवा केंद्रांनी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे,” असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच निविष्ठांची खरेदी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

EPFO New Rules : EPFOचा मोठा निर्णय! PFमधून पैसे काढणे झाले सोपे; जाणून घ्या नवे नियम

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सदस्यांसाठी PF खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये

R Madhavan US Open : आर. माधवनने अनुभवला यूएस ओपनचा रोमांच; आर्थर ॲश स्टेडियमवर ठरला एकमेव भारतीय सेलिब्रिटी

मुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरात ओळख निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता आर. माधवन सध्या त्याच्या

Sangli News : कृष्णेच्या डोहात ८ फूट लांबीच्या मगरीचा वावर; औदुंबर घाटावर भाविकांची गर्दी

सांगली : औदुंबर येथील कृष्णा नदीच्या डोहात सध्या तब्बल ८ ते १० फूट लांबीची मगर वावरत असल्याचे दिसून येत आहे. दररोज

Rakhi Sawant : राखी सावंतविरोधात थेट एनआयएकडे तक्रार; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत तिच्या अतरंगी वक्तव्यांमुळे, सोशल मीडियावरील

Pune Ganeshotsav : पुण्यात गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज; वाहतूक, सुरक्षा आणि स्वच्छतेवर विशेष भर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून तयारीचा आढावा; गर्दीच्या ठिकाणी २४ तास पोलिसांचा बंदोबस्त पुणे :

Mumbai Water Update: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं! भातसा तलावात ९७.४० टक्के पाणीसाठा, सध्याची परिस्थिती काय?

मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख