Global Impact Forum 2026 : आर्थिक संबंधांपलीकडे सांस्कृतिक संवाद आणि मानवी मूल्यांना महत्त्व द्या; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई : मुंबईत ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026’च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी केवळ व्यापार आणि आर्थिक संबंधांच्या माध्यमातून जग अधिक चांगले होणार नाही, तर विविध देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण, मानवी मूल्ये आणि परस्पर संवाद वाढणे गरजेचे असल्याचे सांगितले. ( Global Impact Forum 2026)


जगातील प्रत्येक देशाची संस्कृती, परंपरा आणि विचार करण्याची पद्धत वेगळी असली, तरी मानवतेशी संबंधित अनेक मूल्ये सर्वत्र समान आहेत. या समान मूल्यांच्या आधारावर विविध देशांनी एकमेकांशी संवाद वाढवावा आणि परस्परांचा सन्मान करावा, असे फडणवीस यांनी म्हटले. सध्याच्या काळात जग अनेक पातळ्यांवर विभागलेले दिसत असून अशा परिस्थितीत संवाद आणि सहकार्याची गरज अधिक असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Chief Minister Devendra Fadnavis)



भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारधारेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण जग एक कुटुंब असल्याची भावना भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून आहे. भारताने जगाशी केवळ व्यापार केला नाही, तर ज्ञान, विचार आणि जीवनमूल्यांचीही देवाणघेवाण केली. बौद्ध धर्माचा प्रसार हे त्याचे उदाहरण असून, हा प्रभाव युद्ध किंवा संघर्षातून नव्हे तर विचार आणि मूल्यांच्या माध्यमातून निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमाला ब्रिक्स देशांचे राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांसोबत सांस्कृतिक समानता आणि सहकार्याच्या माध्यमातून नवीन भागीदारीच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या मंचातून केला जाणार आहे.(India-Brazil relations)


कार्यक्रमात भारत आणि ब्राझीलच्या सांस्कृतिक संबंधांवर आधारित दृकश्राव्य सादरीकरणही करण्यात आले. दोन्ही देशांच्या संगीत, नृत्य, क्रीडा आणि उत्सव परंपरांमधील साम्य यामधून दाखवण्यात आले. ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या आयोजनाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.


Comments
Add Comment

Navratri 2026 : नवरात्रीच्या गरब्यात मुस्लिमांना प्रवेशबंदी

- विश्व हिंदू परिषदेची नियमावली जाहीर; हिंदूंना प्रवेशासाठी टिळा बंधनकारक करण्याच्या सूचना मुंबई :

SBI Bisleri Plastic Recycling : 'एसबीआय' आणि 'बिस्लेरी'चा अनोखा उपक्रम! बँकांमधील प्लास्टिक कचऱ्याचा आता होणार पुनर्वापर

'बॉटल्स फॉर चेंज' अंतर्गत 'एसबीआय' अन् 'बिस्लेरी'चा करार मुंबई : देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक असलेल्या 'स्टेट

Dahi Handi 2026 : ‘गोविंदा आला रे आला!’; मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष, ढोल-ताशांचा निनाद अन् गोविंदांचा जोश

मुंबई : ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरात आज दहीहंडीचा

Mumbai ANC Raid : मुंबईत 'ANC'ची मोठी कारवाई : कांदिवली युनिटकडून ६४ लाखांहून अधिक किमतीचे हेरॉईन हस्तगत, दोघांना अटक

मुंबई : मुंबईत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. मुंबई पोलीस

Mumbai Metro 3 Timing Extension : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! मुंबई 'मेट्रो-३' ची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत

१८ इंचाच्या गणपती बाप्पालाही प्रवासाची परवानगी मुंबई : मुंबईचा सर्वात मोठा आणि उत्साहाचा सण असलेल्या

Navi Mumbai Sindhudurg Flight : मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवास होणार अवघ्या साडेतीन हजारांत

- उडान योजनेअंतर्गत १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधीचा निर्णय; पर्यटन आणि व्यापाराला मिळणार नवी चालना मुंबई :