Saturday, September 5, 2026

Mumbai DahiHandi 2026 : धक्कादायक! मालाडमध्ये दहीहंडीचा थरारक अपघात; भिंतीचा खांब कोसळून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू

Mumbai DahiHandi 2026 : धक्कादायक! मालाडमध्ये दहीहंडीचा थरारक अपघात; भिंतीचा खांब कोसळून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान दुर्दैवी घटना घडली. दहीहंडी फोडताना विटांचा खांब कोसळून त्याखाली दबून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रुंद्र कदम असे मृत मुलाचे नाव आहे. (Mumbai DahiHandi 2026)

मिळालेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास चिकूवाडी, मालवणी येथील एकता वेल्फेअर सोसायटी परिसरात ही घटना घडली. काही मुले स्थानिक पातळीवर दहीहंडीचा उत्सव साजरा करत होती. यावेळी दहीहंडीसाठी दोरी एका झाडाला आणि तळमजल्यावरील विटांच्या खांबाला बांधण्यात आली होती. (DahiHandi 2026)

दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न सुरु असताना दुर्घटना घडली

दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक विटांचा खांब कोसळला. यावेळी जवळ असलेल्या रुंद्र कदम या 7 वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याला तातडीने मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच वॉर्ड कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दहीहंडी उत्सव साजरा करताना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >