Saturday, September 5, 2026

Skin Care : बीटाच्या फेसपॅकनं त्वचेला मिळेल पोषण, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक; घरीच बनवा हे फेसपॅक

Skin Care : बीटाच्या फेसपॅकनं त्वचेला मिळेल पोषण, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक; घरीच बनवा हे फेसपॅक

बीटा मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे त्वचेला आतून पोषण देऊन नैसर्गिक चमक मिळवून देण्यास मदत करतात. चेहऱ्यावरील काळे डाग, टॅनिंग आणि रुक्षपणा कमी करण्यासाठी बीटाचा फेसपॅक अत्यंत प्रभावी ठरतो. त्वचेचा पोत सुधारून ती तजेलदार आणि चमकदार बनवण्यासाठी बीटाचे हे सोपे आणि घरगुती फेसपॅक नक्की वापरून पाहा.

बीटाचा फेसपॅक का वापरावा? बीटमध्ये betalains, polyphenols आणि vitamin C यांसारखे antioxidant घटक आढळतात. त्यामुळे बीटाचा वापर घरगुती स्किनकेअरमध्ये केला जातो.  बीट आणि मधाचा फेसपॅक १ चमचा बीटाचा रस किंवा पेस्ट आणि १ चमचा मध एकत्र करा. हा मिश्रण चेहऱ्यावर लावून साधारण १० ते १५ मिनिटांनी धुवा. बीट आणि दही बीटाची पेस्ट आणि १ चमचा साधे दही एकत्र करून चेहऱ्यावर लावा. काही मिनिटांनी हलक्या हाताने धुऊन टाका. बीट आणि अ‍ॅलोव्हेरा बीटाचा रस आणि अ‍ॅलोव्हेरा जेल एकत्र करून फेसपॅक तयार करू शकता. त्वचेवर लावून १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.  बीट आणि मुलतानी माती तेलकट त्वचेसाठी मुलतानी मातीमध्ये थोडी बीटाची पेस्ट मिसळून फेसपॅक तयार करता येतो. पूर्णपणे कोरडे होण्याआधीच चेहरा धुवा.  वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा नैसर्गिक घटकांमुळेही काही जणांच्या त्वचेवर irritation किंवा allergy होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे योग्य. आठवड्यातून किती वेळा? घरगुती फेसपॅक वारंवार वापरण्यापेक्षा आठवड्यातून १ ते २ वेळा वापरून पाहू शकता. त्वचेवर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास लगेच धुवून वापर बंद करा. सतत त्वचेची समस्या असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >