Saturday, September 5, 2026

Ghatkopar DahiHandi : घाटकोपरमध्ये 9 थरांचा थरार; खाली उतरताना 9व्या थरावरील गोविंदा कोसळला

Ghatkopar DahiHandi : घाटकोपरमध्ये 9 थरांचा थरार; खाली उतरताना 9व्या थरावरील गोविंदा कोसळला
मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात मनसेचे नेते गणेश चुक्कल यांच्या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकाने थरारक कामगिरी केली. अंधेरी पूर्व येथील अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथकाने यंदाच्या उत्सवात तब्बल 9 थरांचा मानवी मनोरा उभारला. मुंबईत यंदा 9 थरांची सलामी देणारे हे पहिले पथक ठरल्याचे सांगितले जात आहे. (Mumbai Dahi Handi)

९ व्या थरावरून थेट

9 थरांचा मनोरा उभारल्यानंतर पथकातील गोविंदा खाली उतरत होते. त्याचवेळी 9व्या थरावर असलेला एक गोविंदा अचानक खाली कोसळला. या घटनेमुळे काही क्षणांसाठी उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. (Ghatkopar DahiHandi)

 घटनेचा व्हिडिओ व्हायरल

गोविंदा खाली पडताच इतर सदस्यांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. दहीहंडीच्या उत्साहात मानवी मनोरे उभारताना गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, घाटकोपरमधील गणेश चुक्कल यांच्या दहीहंडी उत्सवात दरवर्षी मोठ्या संख्येने गोविंदा पथके सहभागी होत असतात. गेल्या वर्षी याच ठिकाणी जय जवान गोविंदा पथकाने 10 थरांची कामगिरी केली होती. ( DahiHandi 2026)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >