Worli Traffic Update : वरळी दहीहंडी उत्सवासाठी वाहतूक निर्बंध; जी.एम. भोसले मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी

मुंबई : वरळी येथील जांबोरी मैदानावर आयोजित  ‘परिवर्तन दहीहंडी उत्सव-२०२६’ च्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून ५ सप्टेंबर २०२६ रोजी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. उत्सवासाठी मोठ्या संख्येने गोविंदा पथके, नागरिक आणि वाहनांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात येतील.


वाहतूक पोलिसांच्या नियोजनानुसार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार तात्पुरती ‘नो-पार्किंग’ आणि प्रवेशबंदी लागू केली जाणार आहे. कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.



जी.एम. भोसले मार्गावर प्रवेशबंदी


वरळी नाका ते कुर्णे चौक या दरम्यान जी.एम. भोसले मार्गाच्या दोन्ही दिशांना वाहनांच्या प्रवेशास मनाई करण्यात येणार आहे. तसेच या मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनतळास बंदी राहणार आहे. मात्र पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेची वाहने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.



वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग


उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी वरळी नाका → डॉ. ॲनी बेझंट मार्ग → पोदार जंक्शन → ग्लॅक्सो जंक्शन → पांडुरंग बुधकर मार्ग → कुर्णे चौक असा पर्यायी मार्ग वापरावा.


दक्षिण दिशेच्या वाहतुकीसाठी कुर्णे चौक → पांडुरंग बुधकर मार्ग → ग्लॅक्सो जंक्शन → डॉ. ॲनी बेझंट मार्ग → पोदार जंक्शन → वरळी नाका असा मार्ग उपलब्ध राहणार आहे.


दहीहंडी उत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि शक्यतो निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Gateway of India ferry boat : गेटवे ऑफ इंडियाजवळ फेरीबोट बंद; ३८ प्रवाशांची सुखरूप सुटका

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथून पर्यटकांना समुद्र सफरीसाठी घेऊन गेलेली ‘अन्वरी’ नावाची फेरीबोट समुद्रात अचानक बंद

Mumbai Local Train : रेल्वे प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Prakash Abitkar : 'अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबवा'

मुंबई : महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार

BARTI : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित

Goregaon Bus Fire : गोरेगाव मेट्रो स्थानकाखाली खासगी बस जळून खाक; धुराच्या लोटांमुळे प्रवाशांची धावपळ

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गोरेगाव परिसरात आज एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली. गोरेगाव मेट्रो

Dahi Handi in mumbai local train : धावत्या लोकल ट्रेनमध्येच फोडली दहीहंडी! बदलापूर-ठाणे लोकलमध्ये महिला प्रवाशांचा अनोखा गोपाळकाला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात एका अत्यंत अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या दहीहंडी उत्सवाची दृश्ये समोर