प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. आता पूनम पांडेने अॅडल्ट कंटेंट आणि वेश्याव्यवसायाबाबत केलेल्या एका नव्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर आणि मनोरंजन सृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने भारतामध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर करण्याची मागणी केली आहे.
कांगोच्या राजधानी किंशासामध्ये लग्नाच्या पार्टीदरम्यान भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीत आतापर्यंत किमान 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक ...
‘सोशल सर्व्हिस’ आणि डिप्रेशन मुक्तीचा दावा
आरव्हीसीजे मूव्हीजला दिलेल्या मुलाखतीत पूनमने तिचे बोल्ड आणि अॅडल्ट व्हिडिओ हे एक प्रकारची ‘मोठी सोशल सर्व्हिस’ असल्याचे म्हटले आहे. स्पष्टीकरण देताना ती म्हणाली की, आजच्या धावपळीच्या युगात लोक प्रचंड ताणात असतात, विशेषतः पुरुषांना मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत जर तिच्या एका व्हिडिओमुळे कोणाचा ताण कमी होत असेल, तर त्यात काहीही गैर नाही, असा दावा तिने केला आहे.
गुन्हेगारी कमी होण्यासाठी वेश्याव्यवसाय कायदेशीर करण्याची मागणी
देशातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणावर बोट ठेवताना पूनम पांडे म्हणाली की, समाजात महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या रोखण्यासाठी भारतात वेश्याव्यवसाय अधिकृत आणि कायदेशीर केला पाहिजे. यामुळे महिलांवरील अत्याचारांच्या आणि गुन्ह्यांच्या घटनांमध्ये घट होईल, असा ठाम विश्वास तिने व्यक्त केला आहे.
पनवेल : दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषाला पनवेलमध्ये गालबोट लागले. शहरातील लाईन आळी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान विजेचा प्रवाह उतरल्याने सात जणांना ...
ट्रोलर्सना खडे बोल आणि मित्रांचा दुतोंडी चेहरा
आपल्या बोल्ड कंटेंटमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग आणि टीका सहन करावी लागल्याचे पूनमने मान्य केले. इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आणि तिचे स्वतःचे मित्रही उघडपणे तिच्यावर टीका करतात, परंतु खाजगीमध्ये नेमके तेच लोक तिचे व्हिडिओ पाहतात, असा गौप्यस्फोटही तिने केला. सुरुवातीला ट्रोलर्सच्या कमेंट्स वाचून तिला खूप राग यायचा आणि सडेतोड उत्तर द्यावंसं वाटायचं, पण स्वतःचा स्तर कायम राखण्यासाठी ती स्वतःला शांत करते, असे तिने स्पष्ट केले.






