नवी मुंबई : सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याच्या दराने पुन्हा एकदा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. नवी ...
पहिल्या दिवसाचा खेळ संपताना ईस्ट झोनची अवस्था ४ बाद ३८५ अशी होती. इशान किशनने पहिल्याच दिवशी आपले शतक पूर्ण केले होते. दुसऱ्या दिवशी त्याने त्याच आक्रमक शैलीत फलंदाजी सुरू ठेवत साऊथ झोनच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. तब्बल ३३४ चेंडूंचा सामना करत ३० चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने त्याने २७० धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट ८०.८४ इतका राहिला.
इशानसाठी ही खेळी अनेक अर्थांनी खास ठरली. हे त्याच्या प्रथम-श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे द्विशतक ठरले, तर दुलीप ट्रॉफीतील त्याचे हे पहिले द्विशतक आहे. या सामन्यात त्याच्यासमोर प्रथमच प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावण्याची मोठी संधी होती. मात्र २७० धावांवर त्याचा डाव संपल्याने त्रिशतकाचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरे राहिले.(East Zone batting)
इशानला उत्तम साथ मिळाली ती कुमार कुशाग्रची. कुशाग्रनेही आक्रमक फलंदाजी करत १३२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ५ षटकारांसह १०१ धावा केल्या. त्याच्या शतकामुळे ईस्ट झोनला मोठी धावसंख्या उभारण्यास आणखी बळ मिळाले.(Duleep Trophy 2026)
मुंबई : शुगर कॉस्मेटिक्सच्या सह-संस्थापक विनीता सिंग यांनी कंपनीच्या ताज्या निधी उभारणीच्या फेरीत झालेल्या कमी मूल्यांकनावरून सुरू असलेल्या ...
ईस्ट झोनच्या तळाच्या फलंदाजांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. अनुकूल रॉयने ४५, मोहम्मद कौनियान कुरेशीने ४०, तर मोहम्मद शमीने २८ धावा करत संघाची धावसंख्या सातशेच्या पार नेण्यात हातभार लावला. साऊथ झोनकडून त्रिपुराना विजय हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार बळी घेतले.
अखेर ईस्ट झोनचा संपूर्ण संघ ७०८ धावांवर सर्वबाद झाला. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साऊथ झोनच्या फलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. ईस्ट झोनच्या या धावांच्या डोंगराला साऊथ झोनचे फलंदाज कसे प्रत्युत्तर देतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.