Navi Mumbai APMC : कांद्याने ओलांडली पन्नाशी! APMCत ₹53, किरकोळ बाजारात ₹70; दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले

नवी मुंबई : सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याच्या दराने पुन्हा एकदा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. नवी मुंबईतील APMC घाऊक बाजारात कांद्याचा दर ₹52 ते ₹53 प्रति किलोपर्यंत पोहोचला असून किरकोळ बाजारात हाच कांदा ₹65 ते ₹70 किलोपर्यंत विकला जात आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या या दरवाढीमुळे घरगुती बजेटवर मोठा परिणाम होत आहे.



दरवाढीमागे नेमकं कारण काय?



  • APMCमध्ये कांद्याचा घाऊक दर ₹52–53 किलोवर पोहोचला आहे.

  • किरकोळ बाजारात ग्राहकांना ₹65–70 किलो मोजावे लागत आहेत.

  • पावसामुळे पिकाचे नुकसान आणि चांगल्या प्रतीच्या कांद्याची कमतरता ही दरवाढीमागची प्रमुख कारणे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


नवी मुंबई APMCमध्ये कांद्याची आवक सुरू असली तरी त्यातील मोठ्या प्रमाणातील कांदा ओला किंवा खराब दर्जाचा असल्याने चांगल्या प्रतीच्या कांद्याचा पुरवठा तुलनेने कमी झाला आहे. २ सप्टेंबरला नाशिक आणि लासलगाव भागातून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आला होता; मात्र त्यातील अनेक पोत्यांमध्ये ओला आणि खराब कांदा आढळल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे दर्जेदार कांद्याच्या भावावर दबाव वाढला आहे.(Onion Price Mumbai)


४ सप्टेंबरला APMCमध्ये सुमारे १५० ट्रक कांद्याची आवक झाली होती. मात्र आवक असूनही दर्जेदार मालाची उपलब्धता मर्यादित असल्याने दर कमी झाले नाहीत. नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होईपर्यंत दर चढे राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.(APMC)



केंद्राच्या बफर स्टॉकचा फायदा ग्राहकांना कधी?


कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा ₹35 किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. २८ ऑगस्टपासून पहिल्या दहा दिवसांत १७ शहरांमध्ये सुमारे ४ हजार टन बफर कांद्याची विक्री करण्यात आली. मात्र देशातील सरासरी किरकोळ दरात अद्याप अपेक्षित घट झालेली नाही.(APMC Market)


मग कांद्याचे दर पुन्हा कमी होणार कधी? नवीन आवक वाढते का, पावसामुळे झालेले नुकसान किती आहे आणि चांगल्या प्रतीचा कांदा बाजारात किती प्रमाणात उपलब्ध होतो, यावर आगामी काळातील दर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहेत.

Comments
Add Comment

Chhath Puja Train Rush : दिवाळी अन् छठपूजेचा माहोल! पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी; प्रशासनाकडून विशेष सुरक्षा उपाय लागू

पुणे : दिवाळीचा सण आणि पाठोपाठ येणारी छठपूजा यामुळे सध्या पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा अक्षरशः लोट लोटताना

मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश! परदेशी महिलेच्या शरीरातून कोकेनच्या 11 कॅप्सुल ताब्यात

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली

Ashish Shelar: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे भाजपला अमान्य, मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांसमोर ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून तिची सखोल चौकशी

IND vs NZ पहिल्या टी20 सामन्यात 225 धावांचा यशस्वी पाठलाग करून भारताने नोंदवले विक्रम, काय ते जाणून घ्या

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिला विजय मिळवला आहे. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाचे वीज बिल शून्यावर आणणार, मंत्री पंकजा मुंडे यांचा शब्द

मुंबई: सौर ऊर्जेचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून

सात महिन्यांपासून सासवड नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना वेतनच नाही, कामगार मंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे दिले निर्देश

मुंबई: सासवड नगरपालिकेतील 230 कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा