Nashik : नाशिक शहरातील ठक्कर बाजार बसस्थानकात रविवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे दर्शनासाठी कुटुंबासोबत निघालेल्या १७ वर्षीय आकांक्षा रामभाऊ शेलार हिचा एसटी बसच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली असून, गर्दीच्या काळात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Nashik Accident News)
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन भागात ५ मजली इमारत कोसळून झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
गर्दीत अचानक धक्का लागला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा शेलार ही आपल्या कुटुंबीयांसोबत त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात (Thakkar Bazar Bus Station) आली होती. रविवारी रात्री बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती. बस पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू असतानाच आकांक्षाला अचानक जोराचा धक्का लागला. त्यामुळे ती खाली कोसळली. याचवेळी स्थानकातून पुढे जात असलेल्या एसटी बसचे मागील चाक तिच्या अंगावरून गेले आणि या भीषण अपघातात आकांक्षाचा जागीच मृत्यू झाला. आपल्या मुलीचा डोळ्यांसमोर झालेला हा भीषण अपघात पाहून आकांक्षाच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला. त्या घटनास्थळीच भोवळ येऊन पडल्या. यानंतर आकांक्षाच्या चुलत भावाने प्रसंगावधान राखत त्यांच्या आईला तातडीने रिक्षातून नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik District Hospital) उपचारासाठी नेले. (Nashik Accident News)
Ahilynagar News : आपत्तीग्रस्त आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदत व सानुग्रह अनुदानाच्या वाटपात नियमांचे उल्लंघन करून शासकीय निधीचे ...
डॉक्टरांनी मृत घोषित केले
आकांक्षाला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेनंतर ठक्कर बाजार बसस्थानकातील (Thakkar Bazar Bus Station) प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि गर्दीच्या नियोजनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांची सुरक्षितता, बसची ये-जा आणि स्थानकातील व्यवस्थापन याबाबत अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. (Nashik Accident News)
पालघर : पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्टला मारहाण केल्याप्रकरणी (उबाठा) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि आमदार राजेंद्र गावित ...
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात
दरम्यान, जळगावजवळील पाळधी-तरसोद बायपासवर (Paldhi-Tarsod Bypass) भीषण अपघाताची घटना घडली आहे. तरसोद गावाजवळ ट्रॉली आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. (Paldhi-Tarsod Bypass Accident News) दोन्ही चालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याचा भराव खचल्याने हा बायपास दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, याच बंद मार्गावर हा भीषण अपघात झाल्याने रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




