प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा करिअरमधून ब्रेक ! आता स्टार्टअपसाठी चाहत्यांकडे मागितल्या भन्नाट आयडिया

Abhinay Berde : दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचा मुलगा आणि अभिनेता अभिनय बेर्डे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनयने करिअरमधून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा ब्रेक अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम करण्यासाठी नसून, स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्यासाठी असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.विशेष म्हणजे, स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याच्याकडे सध्या कोणती ठोस व्यावसायिक कल्पना आहे, हे निश्चित झालेलं नाही. त्यामुळे अभिनयने थेट आपल्या चाहत्यांकडे मदत मागितली आहे.



मी करिअरमधून ब्रेक घेतोय...


'मी करिअरमधून ब्रेक घेतोय. पुढच्या प्रवासासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की कमेंट करा,’ असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिनयने त्याच्या व्हिडीओची सुरुवातच हा व्हिडीओ पोस्ट करण्यामागचं कारण वेगळं आणि महत्त्वाचं असल्याचं सांगत केली. त्याने म्हटलं की, “मी माझ्या करिअरमधून थोडा ब्रेक घ्यायचं ठरवलंय.” मात्र हा ब्रेक अभिनय क्षेत्रापासून कायमचा दूर जाण्यासाठी नसून एका नव्या प्रवासासाठी असल्याचं त्याने स्पष्ट केलं. स्वतःचं स्टार्टअप सुरू करण्यासाठी आपण करिअरमधून ब्रेक घेत असल्याचं अभिनयने सांगितलं. मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासोबतच आता व्यवसायाच्या जगात काहीतरी नवीन करण्याची त्याची इच्छा असल्याचं या व्हिडीओतून दिसून येत आहे.



क्रेझी आयडिया असतील, तर मला नक्की सांगा


अभिनय असेही म्हटले आहे की, “काही आऊट ऑफ द बॉक्स आणि क्रेझी आयडिया तुमच्याकडे असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा,” असं आवाहन त्याने केलं आहे. इतकंच नाही, तर चाहत्यांची एखादी कल्पना आवडली तर त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करण्याची संधीही देणार असल्याचं अभिनयने सांगितलं आहे. अभिनयच्या या पोस्टवर त्याची बहीण स्वानंदी बेर्डे हिनेही मजेशीर कमेंट केली आहे. “भावा, माझ्यामध्ये गुंतवणूक कर,” अशी कमेंट स्वानंदीने केली.लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेणाऱ्या अभिनयने आता व्यवसायाच्या क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याला चाहत्यांकडून कोणत्या भन्नाट व्यावसायिक कल्पना मिळतात आणि त्यापैकी एखादी कल्पना प्रत्यक्षात स्टार्टअपचं रूप घेते का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Mahatma Gandhi Biopic : गांधीजींच्या भूमिकेसाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करणारा हा अभिनेता आहे तरी कोण...? फर्स्ट लूक भलताच चर्चेत!

मुंबई : असंख्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा अशा आहेत, ज्या पडद्यावर साकारण्याचं स्वप्न अनेक कलाकार पाहतात. छत्रपती

Poonam Pandey : पूनम पांडे म्हणतेय, ‘वेश्याव्यवसाय कायदेशीर करा’! सोशल मीडियावर चर्चेला उधाण

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच तिच्या बोल्ड आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. आता पूनम

Mirzapur The Movie : ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या दोन दिवसांत ६० कोटींचा टप्पा पार

मुंबई : लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘मिर्झापूर: द

Suraj Chavan : कृष्णाच्या जन्मदिनी सूरजच्या घरी ‘राधा’ जन्मली; बाबा होणं ही भावना शब्दात व्यक्त करता येत नाही...

मुंबई : बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना चव्हाण यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

Bigg Boss 20 Contestants List : ‘बिग बॉस 20’ सुरू होण्याआधीच स्पर्धकांची नावं चर्चेत; यंदा कोण कोण दिसणार बिग बॉसच्या घरात?

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ आता आपल्या २०वा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या

Hanuman Ansh Movie : पाचव्या आठवड्यातही ‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच

मुंबई : कोणताही बॉलिवूड सुपरस्टार नसतानाही ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत