Ganeshotsav ST BUS: गणेशोत्सवात गावी जायचं तिकिट कन्फर्म झालं का? उपमुख्यमंत्र्यांनी केली मोफत बससेवेची घोषणा; वाचा सविस्तर

ठाणे: गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता चाकरमान्यांचे पाऊलं आपल्या गावी वळताना दिसत आहेत (Ganeshotsav 2026). गणेशोत्सवाच्या काळामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गावी जाणाऱ्या नोकरदारांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बातमी म्हणता येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Cm Eknath Shinde) यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणाऱ्या नोकरदारांसाठी मोफत बसेसची व्यवस्था केलेली आहे. यामुळे गणेशभक्तांचा आरामदायी आणि सुखकर प्रवास होणार आहे. (Thane News)



२०२६ च्या गणेशोत्सवासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील गणेशभक्तांना त्यांच्या गावी प्रवास करण्यास मदत करण्यासाठी एसटी महामंडळाने सुमारे २९०० बसेसची पूर्णपणे मोफत व्यवस्था केलेली आहे, अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेतर्फे पार पडलेल्या मोफत बससेवेच्या तिकीट वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. (Kokan News)


ऐन वेळी तिकिट उपलब्ध न झालेल्या प्रवाशांसाठी ही सेवा सोयीस्कर ठरणार आहे. या उपक्रमाचा उद्देश गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर करणे हा आहे, अशी माहिती सुद्धा शिंदेंनी दिली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने लोक पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपापल्या मूळ गावी परत येतात.



शिंदे म्हणाले की, सणासुदीच्या काळात वाहतूक ही एक मोठी समस्या बनते, कारण प्रत्येकाला रेल्वे किंवा इतर प्रवासाचे तिकीट मिळत नाही. ते म्हणाले की, शिवसेनेच्या (Shivsena) समाजकार्यावरील भर आणि राजकारणापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देण्याच्या तत्त्वानुसार मोफत बस सेवा राबविण्यात येत आहे.

Comments
Add Comment

BMC : महापालिकेची भरकटलेली दिशा

सचिन धानजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महापालिकेच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

KEM Hospital Mumbai : केईएम रुग्णालयात आता मेंदूविषयक आजारांचे झटक्यात निदान

एआय आणि न्यूरोसायन्सच्या सहाय्याने या आजारांचे अचूक निदान आणि विश्लेषण करण्यासाठी प्रयोगिक तत्वावर राबवणार

Municipal Schools : महापालिका शाळांमधील मुलांना आता संविधानिक मुल्यांचे शिक्षण

इयत्ता सहावीच्या मुलांसाठी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारीत पुस्तकांतील धडे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारतीय

Kanjurmarg Dumping Ground : कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचरा आणि दुर्गंधीवर ‘निरी’च्या उपाययोजना

सभोवतालच्या नागरी वस्तीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करणार मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचा कांजूर मार्ग

Mumbai News : उत्तर मुंबईत सहा ठिकाणी कौशल्य विकास केंद्रांची उभारणी

स्थानिक पातळीवर कार्यरत ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्ग मुंबई महानगरपालिका आणि

BEST Bus : मुंबईत दिव्यांगांच्या मोफत बेस्ट बस प्रवासावर ७.६४ कोटींचा खर्च

मागील आर्थिक वर्षातील अनुदानाची रक्कम बेस्टला महापालिका अदा करणार मुबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील दृष्टीहीन