Monday, September 7, 2026

Mangal Prabhat Lodha : 'आयटीआय'च्या नामांतर प्रक्रियेतून पालकमंत्र्यांना वगळले; मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे एकाधिकार

Mangal Prabhat Lodha : 'आयटीआय'च्या नामांतर प्रक्रियेतून पालकमंत्र्यांना वगळले; मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे एकाधिकार

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि तांत्रिक विद्यालयांच्या नामांतरासाठी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसोबत विचार विनिमय करण्याची तरतूद रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता नामांतराच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे या विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या एकादस्यीय समितीकडे असणार आहेत.(Mangal Prabhat Lodha)

राज्याच्या कौशल्य विकास विभागाने सोमवारी शासन निर्णय (GR) जारी करत नामांतराचे सर्वाधिकार विभागाच्या मंत्र्यांकडे राहतील, अशी व्यवस्था केली आहे. राज्यातील शासकीय आयटीआयच्या नावात बदल करण्यासाठी कौशल्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीने नामांतराचा निर्णय घेताना संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी विचारविनिमय करावा, अशी तरतूद करण्यात आली होती.(Mangal Prabhat Lodha)

मात्र, सोमवारी जारी केलेल्या जीआरनुसार आयटीआय-सोबतच शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराचे अधिकारही विभागाचे मंत्री असलेल्या लोढा यांच्या समितीकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र, नव्या निर्णयात पालकमंत्र्यांशी विचारविनिमय करण्याची पूर्वीची अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे नामांतराच्या प्रस्तावांवरील निर्णय प्रक्रियेतून संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना एका अर्थाने दूर करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >