Monday, September 7, 2026

Mary Kom Bigg Boss 20 Entry : मेरी कोम उतरली ‘बिग बॉस २०’च्या आखाड्यात; प्रियांका चोप्राने दिल्या खास शुभेच्छा

Mary Kom Bigg Boss 20 Entry : मेरी कोम उतरली ‘बिग बॉस २०’च्या आखाड्यात; प्रियांका चोप्राने दिल्या खास शुभेच्छा

मुंबई : बॉक्सिंगच्या रिंगमध्ये भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणारी वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम आता सलमान खानच्या ‘आखाड्यात’ दाखल झाली आहे. छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस २०’मध्ये मेरी कोमची दमदार एन्ट्री झाली असून, तिच्या सहभागामुळे शोची चर्चा आणखी रंगली आहे. (Mary Kom Bigg Boss 20 Entry)

टीव्ही आणि सोशल मीडिया क्षेत्रातील लोकप्रिय चेहऱ्यांसोबत आता वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोमच्या एन्ट्रीमुळे ‘बिग बॉस २०’च्या घरातील उत्सुकता आणखी वाढली आहे. शोमध्ये मेरी कोमच्या नावाची घोषणा होताच बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही तिला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. मेरी कोमचा ‘बिग बॉस’मधील प्रवास पाहण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रियांकाने म्हटलं आहे. (Mary Kom Bigg Boss 20 Entry)

प्रियांका चोप्रा आणि मेरी कोम यांच्यातील नाते खूप जुने आहे. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या उमंग कुमार दिग्दर्शित 'मेरी कोम' या बायोग्राफी फिल्ममध्ये प्रियांकाने मेरी कोमची भूमिका पडद्यावर जिवंत केली होती. या चित्रपटासाठी प्रियांकाने घेतलेली अफाट मेहनत आणि बॉक्सिंगचे घेतलेल्या कठीण प्रशिक्षणाचे आजही कौतुक होते. (Mary Kom Bigg Boss 20 Entry)

आता अनेक वर्षांनंतर, ज्या खेळाडूची संघर्षगाथा प्रियांकाने रुपेरी पडद्यावर मांडली होती, तीच खेळाडू जेव्हा 'बिग बॉस'सारख्या अतरंगी रिॲलिटी शोमध्ये पाऊल ठेवत आहे, तेव्हा प्रियांकाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रियांकाने एका व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून मेरी कोमला तिच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या असून, ती घरात कशी खेळणार, हे पाहण्यासाठी आपण आतुर झाल्याचे म्हटले आहे. (Mary Kom Bigg Boss 20 Entry)

मेरी कोमने आजवर आपल्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ बॉक्सिंग रिंगमधील प्रतिस्पर्ध्याचा सामना केला आहे. पण 'बिग बॉस'चे घर हे खेळाच्या मैदानापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इथे १०४ कॅमेरे, अचानक मिळणारे टास्क, नॉमिनेशनची टांगती तलवार आणि क्षणाक्षणाला बदलणारी समीकरणे असतात. अशा वातावरणात मेरीचे वागणे कसे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेरीने आधीच स्पष्ट केले आहे की ती घरात कडक शिस्त आणणार आहे; मात्र घरातील कटकारस्थाने आणि वादविवादांना ती आपल्या कशी मात देते, हे पाहणे रंजक ठरणार आहे. (Mary Kom Bigg Boss 20 Entry)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >