Recruitment Exam : भरती परीक्षांमध्ये मोठ्या सुधारणा होणार? सरकारचा उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यभर उमेदवारांशी थेट संवाद साधणार

मुंबई : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. हा टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधणार आहे. (Recruitment Exam)


भरती परीक्षांमध्ये गैरप्रकारांना आळा घालणे, परीक्षा प्रक्रियेची सुरक्षा अधिक मजबूत करणे, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवणे तसेच संपूर्ण परीक्षा व्यवस्था उमेदवारांसाठी अधिक सुलभ आणि उत्तरदायी करण्याच्या दृष्टीने या टास्क फोर्सकडून विविध सूचना आणि अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.


या विभागनिहाय भेटींमध्ये विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या अडचणी थेट मांडता येणार आहेत. त्याचबरोबर पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि परीक्षा व्यवस्थेशी संबंधित अन्य हितधारकांकडूनही सूचना मागवण्यात आल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी, संभाव्य गैरप्रकार, सुरक्षा व्यवस्था, प्रशासनिक अडचणी आणि उमेदवारांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत टास्क फोर्सकडून माहिती घेतली जाणार आहे.(Maharashtra Recruitment 2026)



टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक


पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६
स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in


नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६
स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर
ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in


अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६
स्थळ : अमरावती
ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in


छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६
स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर
ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in


कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६
स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई
ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in


नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in



नागरिक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि इतर संबंधित हितधारकांना आपल्या सूचना आणि अभिप्राय संबंधित विभागासाठी देण्यात आलेल्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवता येणार आहेत. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभवलेल्या अडचणी आणि सुधारणांसाठीच्या सूचना शासनापर्यंत पोहोचवण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.(Maharashtra Recruitment 2026)


या सहा विभागांमधून प्राप्त होणाऱ्या सूचना, तक्रारी, अडचणी आणि अभिप्रायांचा उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. त्याआधारे राज्यातील भरती परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनाला शिफारशी सादर केल्या जाणार आहेत.


दरम्यान, विभागनिहाय भेटीची अचूक वेळ, सहभागाची प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, उमेदवार, पालक, शिक्षक आणि अन्य हितधारकांनी संबंधित विभागीय कार्यालयाकडून जाहीर होणाऱ्या पुढील सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (Recruitment Exam)


भरती परीक्षांच्या पारदर्शकतेबाबत आणि सुरक्षिततेबाबत सातत्याने उपस्थित होणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर शासनाचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. थेट उमेदवार आणि संबंधित घटकांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवातून सुधारणा सुचवण्याचा प्रयत्न या प्रक्रियेत केला जाणार असल्याने आगामी काळात राज्यातील भरती परीक्षा व्यवस्थेत कोणते बदल होतात, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

College Admission : ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई; इयत्ता ११ वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे शिक्षण संचालनालयाचे निर्देश

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच

Dadaji Bhuse : ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

भौतिक सुविधा आणि संस्कारांवरही भर मुंबई : राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य

School Material Distribution : शालेय साहित्य वाटपावर मोठं स्पष्टीकरण; वह्यांबाबतचा दावा फोल

शालेय वस्तूंच्या वाटपावरून विरोधकांचा फेल नॅरेटिव्ह सर्व साहित्यांचे वाटप शाळांमध्ये अंतिम

Vishakha Raut : उबाठाच्या विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व अखेर रद्द

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादरमधील प्रभाग क्रमांक १९१च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व अखेर

Mangal Prabhat Lodha : 'आयटीआय'च्या नामांतर प्रक्रियेतून पालकमंत्र्यांना वगळले; मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे एकाधिकार

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि तांत्रिक विद्यालयांच्या नामांतरासाठी संबंधित जिल्ह्याच्या

Central Railway : मध्य रेल्वेकडून कोकणवासीियांना मोठी भेट; CSMT-सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्सप्रेस सुरू

Mumbai : मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेद्वारे