पुणे : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने विक्रमांचे डोंगर उभारणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आता रिअल इस्टेटमध्ये तब्बल ₹70 कोटींची मोठी गुंतवणूक केली आहे. तेंडुलकर यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या लोणावळ्यात सुमारे 3.86 एकर जमीन खरेदी केली आहे. मालमत्ता नोंदणीशी संबंधित कागदपत्रांनुसार हा व्यवहार ४ सप्टेंबर २०२६ रोजी तीन स्वतंत्र कन्व्हेयन्स डीडद्वारे नोंदवण्यात आला.(Sachin Tendulkar Lonavala property)
मुंबई : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नागरिक, पालक, ...
या व्यवहारांची एकत्रित किंमत सुमारे ₹69.99 कोटी आहे. एकूण जमीन सुमारे 15,601.78 चौरस मीटर, म्हणजेच जवळपास 1.68 लाख चौरस फूट किंवा 3.86 एकर इतकी आहे. ही मालमत्ता लोणावळ्याच्या मावळ तालुक्यातील एच वॉर्डमधील चार सिटी सर्व्हे क्रमांकांमध्ये पसरलेली आहे.(Sachin Tendulkar 70 crore)
उर्वरित दोन व्यवहार अनुक्रमे ₹4.56 कोटी आणि ₹1.75 कोटींचे आहेत. या दोन्ही मालमत्तांमध्ये तेंडुलकर यांनी 50 टक्के अविभाजित हिस्सा खरेदी केला आहे. या दोन व्यवहारांमधील संबंधित क्षेत्रफळ अनुक्रमे 2,302.27 आणि 803.93 चौरस मीटर असल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद आहे.(Sachin Tendulkar 3.86 acre)
या संपूर्ण व्यवहारासाठी तेंडुलकर यांनी सुमारे ₹4.20 कोटी स्टॅम्प ड्युटी भरली असून, नोंदणी शुल्क सुमारे ₹90 हजार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तेंडुलकर यांनी ही मालमत्ता नंदन धनंजय मेहता आणि विवस्वत धनंजय मेहता यांच्याकडून खरेदी केल्याचे नोंदणी कागदपत्रांवरून समोर आले आहे.
मग सचिन तेंडुलकरांनी लोणावळ्यात एवढी मोठी जमीन नेमकी कशासाठी घेतली?
सध्या याचे उत्तर स्पष्ट झालेले नाही. मात्र ₹70 कोटींच्या या मोठ्या व्यवहारामुळे तेंडुलकरांची लोणावळ्यातील रिअल इस्टेट गुंतवणूक चर्चेचा विषय ठरली आहे.






