मुंबई : बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा (Ashti Vidhansabha) मतदारसंघातील नगरपंचायत आणि ग्रामपंचायत स्तरावर आधुनिक फिश मार्केट (मत्स्य बाजारपेठ) उभारणीच्या कामाला गती द्यावी. यासंदर्भातील प्रस्तावांना तातडीने मान्यता देऊन संबंधित अधिकाऱ्यांनी कालबद्धरीत्या पुढील कार्यवाही पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आष्टी विधानसभा क्षेत्रात आधुनिक फिश मार्केट उभारणीस प्रशासकीय मंजुरी देणे व आवश्यक निधी उपलब्ध करून देणे या विषयावर मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर बीडचे जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे (Video Conferencing) सहभागी झाले होते.
पणजी : 2004 ते 2014 या कालावधीत विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात 26 लाख किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते, ज्यांची किंमत सुमारे 40,000 ...
तांत्रिक तपासणी करून कामे वेळेत पूर्ण करा
बैठकीदरम्यान आमदार सुरेश धस यांनी माहिती दिली की, आष्टी मतदारसंघातील ३ नगरपंचायती आणि ६ ग्रामपंचायतींमध्ये मत्स्य बाजारपेठ उभारणीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहे.. यावर बोलताना मंत्री नितेश राणे यांनी या सर्व प्रस्तावांच्या आराखड्याची तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रस्तावांची पडताळणी करून मंजुरीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे सांगत कामाची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. फिश मार्केटची उभारणी करताना त्याची वास्तुरचना (Architecture) आधुनिक असावी आणि तिथे स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज वातावरण निर्माण केले जावे, असे मंत्री राणे यांनी नमूद केले. बाजारात येणाऱ्या नागरिकांना तसेच विक्रेत्यांना दीर्घकालीन आणि दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक आहे.