मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दादरमधील प्रभाग क्रमांक १९१च्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व अखेर रद्द करण्यात आले. महापालिका सभागृहात महापौर रितू तावडे यांनी राऊत यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळे उबाठाच्या आतापर्यंत दोन नगरसेवकांचे महापालिका सदस्यत्व रद्द झाले असून आतापर्यंत मुंबई महापालिकेतील एकूण ५ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. (Vishakha Raut)
पालघर जातपडताळणी समितीने विशाखा राऊत यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविले. महापालिकेला याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभाग अपर मुख्य सचिव -२ यांना, विशाखा राऊत यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याबाबत पत्र पाठवून माहिती दिली आहे. विशाखा राऊत यांना पुढील सहा वर्षे नगरसेवकपदाची निवडणूक लढविता येणार नसल्याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला होता. त्यानंतर नगरविकास खात्याने याबाबतची अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार सोमवारी महापालिका सभागृहात विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली. २० ऑगस्ट २०२६पासून त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Vishakha Raut)
- एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर अध्यक्ष विवेक भीमनवार यांची स्पष्टोक्ती; वस्तुस्थिती स्पष्ट करूनही वैयक्तिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत ...
नगरसेविका विशाखा राऊत यांनी, मुंबई महापालिकेच्या २०२५- २६ निवडणुकीत दादर येथील प्रभाग क्र. १९१ मधून माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांच्यासमोर ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत बहुमताच्या जोरावर विशाखा राऊत यांनी निवडणूक जिंकली होती. मात्र प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्या जातप्रमाणपत्राबाबत जात पडताळणी समितीकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी,निवडणूक लढवताना विशाखा राऊत यांनी, चैताली जितेंद्र राऊळ, अमृता जितेंद्र राऊळ व विराज जगदीश राऊळ यांचे कुणबी जातीचे वैधता प्रमाणपत्रे सोबत जोडली होती. परंतु सदर जात वैधता प्रमाणपत्र धारकांशी अर्जदाराचे पुराव्यांच्या अभावी रक्तनातेसंबंध सिध्द होऊ शकलेले नाहीत, असे कारण चौकशीनंतर जातपडताळणी समितीने दिले. पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने विशाखा राऊत यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरले असल्याचे मुंबई महापालिकेला कळवले होते. (Vishakha Raut)
मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि तांत्रिक विद्यालयांच्या नामांतरासाठी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसोबत विचार विनिमय ...
यापूर्वी उबाठाचे दिपक सावंत यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर आता विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व रद्द झाले आहेत.तसेच यापूर्वी एमआयएमचे दोन नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक अशाप्रकारे एकूण पाच नगरसेवकांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. (Vishakha Raut)