Kalyan News: "दुकानासमोर शिवी का देतो ?" जाब विचारल्यामुळे महिलेला मारहाण, कल्याण पूर्वेतील घटना; मारहाणीचा सीसीटीव्ही समोर

कल्याण: कल्याण पूर्वेतील (Kalyan News) नेतिवली परिसरामध्ये पुन्हा एकदा फ्री स्टाईल हाणामारीचा प्रकार घडलेला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना ४ सप्टेंबरला (शुक्रवारी) रात्री घडली असून कोळसेवाडी पोलिस स्थानकामध्ये हा घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. "दुकानासमोर शिवी का देतो ?" असा जाब विचारल्यामुळे काही तरूणांनी दुकानदार महिलेला आणि तिच्या मुलीला जबर मारहाण केली आहे. संपूर्ण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. (CCTV Video)



दरम्यान, नेतिवली परिसरातील एका किराणा मालाच्या दुकानासमोर शुक्रवारी रात्री मारहाणीची घटना घडली. काही तरूणांचा जमाव किराणाच्या दुकानासमोर उभा होता. अचानक जमावातील एका तरूणाने मोठमोठ्या आवाजात शिव्या द्यायला सुरूवात केली. यामुळे दुकानासमोरून जाणाऱ्या लोकांना, दुकानातील ग्राहकांना आणि दुकानदाराला याचा नाहक त्रास झाला. त्यामुळे एका महिलेने त्या तरूणाला "दुकानासमोर शिवी का देतो ?" असा जाब विचारला. त्या महिलेने जाब विचारल्यामुळे जमावातील तरूणाने महिलेसोबत वाद घालायला सुरूवात केली. (Viral Video)



हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही, त्या संतप्त तरूणाने वादामध्ये त्या महिलेवर हात उगारला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे त्या महिलेची मुलगी, दुकानदार आणि शेजारचे लोकं मध्ये पडले. वादादरम्यान त्या तरूणाने महिलेसह तिच्या मुलीला आणि दुकानदाराला मारहाण केली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडवून घेतला. त्यानंतर जखमी महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी महिलेने

">कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एनसीआर नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Mumbai Traffic Update: ऐन गणेशोत्सवात मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल, कोणते आहेत पर्यायी मार्ग

मुंबई: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. वांद्रे परिसरामध्ये पुढच्या आठवड्यात काही दिवसांसाठी

Breaking! दिशा सालियन प्रकरणात नवीन ट्विस्ट: सचिन वाजे माफीचा साक्षीदार? वकील निलेश ओझा यांचा खळबळजनक दावा

मुंबई :  दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू

Dadar BEST Driver : दादरच्या टिळक पुलाजवळ ट्रॅफिक जॅममधून वाट दिली नाही म्हणून BEST चालकाला मारहाण; व्हायरल व्हिडिओने खळबळ

मुंबई : मुंबईच्या दादरमधील टिळक पुलाजवळ रविवारी सायंकाळी एक संतापजनक घटना समोर आली आहे. रस्त्यावर ट्रॅफिक जाम

Ganeshotsav ST BUS: गणेशोत्सवात गावी जायचं तिकिट कन्फर्म झालं का? उपमुख्यमंत्र्यांनी केली मोफत बससेवेची घोषणा; वाचा सविस्तर

ठाणे: गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता चाकरमान्यांचे पाऊलं आपल्या गावी वळताना

BMC : महापालिकेची भरकटलेली दिशा

सचिन धानजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महापालिकेच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

KEM Hospital Mumbai : केईएम रुग्णालयात आता मेंदूविषयक आजारांचे झटक्यात निदान

एआय आणि न्यूरोसायन्सच्या सहाय्याने या आजारांचे अचूक निदान आणि विश्लेषण करण्यासाठी प्रयोगिक तत्वावर राबवणार