Ketan Agarwal Murder Case : आधी हात-पाय मोडायचे, मग संपवायचे केतनला! सिया-चेतन नव्हे, रितेश हिंगेच मास्टरमाइंड?; एका चुकीने सगळं उघड














केतन अग्रवाल हत्याकांडात नवीन वळण! सिया-चेतननंतर मित्र रितेश हांडे अटकेत; हत्येच्या कटाचा पर्दाफाश


पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohagad fort) किल्ल्यावरून प्रसिद्ध व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवाल (Ketan Agarwal) याला धक्का देऊन हत्या केल्याच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरीचा कॉलेजमधील मित्र रितेश हंगे याला शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. रितेशचा या हत्येच्या कटाशी संबंध असल्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली. ( Ketan Agarwal Murder Case)



चॅटींगमुळे हत्येचा कट समोर 


पोलिसांच्या तपासात केतनची थेट हत्या करण्यापूर्वी त्याला अपंग करण्याचा कट आखण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील संशयितांमध्ये झालेल्या चॅटिंगमधून हत्येच्या कटाबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. विशेष म्हणजे, संबंधित तिघांनी त्यांच्या मोबाइलमधील चॅट डिलीट केली होती. मात्र, फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी मोबाइलमधील हटवलेला डेटा पुन्हा मिळवला. (Lohagad murder case)



हत्येनंतर रितेशला भेटला अन्


या चॅटमध्ये आरोपींमध्ये गुन्ह्याशी संबंधित चर्चा स्पष्ट शब्दांत झाल्याचे तपासात आढळले. रितेशला केतनच्या हत्येच्या कटाची आधीपासून माहिती असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हत्येनंतर चेतनने रितेशची भेट घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. (Pune crime news)



पुढील तपास सुरु 


चेतन आणि रितेश हे कॉलेजपासूनचे मित्र असल्याचे पोलिसांनी सांगितले. रितेश मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी कंपनीत काम करत होता. हत्येचा कट माहीत असूनही रितेशने पोलिसांना माहिती दिली नसल्याचा आरोप आहे. तसेच तो तपासात पूर्ण माहिती देत नसल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनेच्या वेळी रितेश लोहगडावर उपस्थित होता का, याचाही तपास सुरू आहे. (Pune Rural Police)



रितेशच्या अटकेनंतर हत्याकांडला वेगळंच वळण 


केतन अग्रवाल याचा 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते. मात्र, तपासानंतर हा अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता रितेशच्या अटकेनंतर या प्रकरणातील कटाबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. (Siya Goyal)




 





Comments
Add Comment

Disha Salian Case : 'तो मोठा खुलासा करणारच होता अन्...' दिशा सालियन प्रकरणात सुशांतच्या भावाच्या दाव्याने खळबळ

मुंबई : मुंबईतील दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित काही नेते, त्यांचे नातेवाईक आणि व्यावसायिक सहकाऱ्यांच्या आर्थिक

Crime News : 'तो' 75 वर्षांचा खासदार अन् ती '19' वर्षाची पत्नी! 19 वर्षीय दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूप्रकरणी 75 वर्षीय खासदारासह तिघांना अटक

Bangladesh News : बांगलादेशातील एका 75 वर्षीय खासदाराला त्याच्या 19 वर्षीय दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली

Crime News : सत्तरीत फुललेल्या प्रेमाचा रक्तरंजीत शेवट, 70 वर्षीय वृद्धाच्या हत्येप्रकरणी वृद्ध महिलेला अटक

Pandharpur Crime News : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. पंढरपूर तालुक्यातही असंच वयाचं बंधन नसलेलं प्रेम पहायला

Jamui Crime : भररस्त्यात मुलीला अडवून नको तिथे स्पर्श; व्हायरल व्हिडिओतील 'ती' धक्कादायक दृष्यं पाहून संतापाची लाट!

दहावीच्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तरुणांकडून त्रास; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 3 जणांना अटक जमुई :

  Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; 22 सप्टेंबरला अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा, कुठे बरसणार जोरदार सरी?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत पावसाच्या सरी सुरू आहेत. मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली