Guwahati Crime News : पत्नीची हत्या करून शीर फ्रिजमध्ये लपवलं, हत्येचं धक्कादायक कारण समोर

Crime News : गुवाहाटीच्या (Guwahati) हाटीगाव परिसरात पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपीने पत्नीचं शीर धडापासून वेगळं करून ते घरातील फ्रिजमध्ये लपवून ठेवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.हत्येनंतर मृतदेह लपवून आरोपी पती घरातून पसार झाला. मात्र, काही काळानंतर आरोपीने स्वतःहून हाटीगाव पोलीस ठाण्यात (Hatigaon Police Station) शरणागती पत्करली. रिया तालुकदार गोस्वामी (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव असून, तिच्या हत्येप्रकरणी पती रामानुजन गोस्वामी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Guwahati Crime News)



रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, शीर फ्रिजमध्ये


मृत महिलेचं नाव रिया तालुकदार, तर तिच्या पतीचं नाव रमानुष गोस्वामी असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री रिया यांच्याशी कुटुंबीय संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांचा संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच हाटीगांव पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांसमोर जे दृश्य आलं, ते हादरवून टाकणारं होतं. घरात रियाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तीचं शीर धडापासून वेगळं करण्यात आलं होतं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मृत महिलेचं शीर घरातील फ्रिजमध्ये लपवून ठेवण्यात आलं होतं. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. (Guwahati Crime News)



पत्नीच्या चारित्र्यावर संशय ?


गुवाहाटी पूर्वचे पोलीस उपायुक्त टी.आर. पेगु यांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात पती-पत्नीमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाल्याचं समोर आलं आहे. रमानुष गोस्वामी याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याचं सांगण्यात येत आहे. रियाचे इतर कोणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या दिवशी सकाळीही दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. (Guwahati Crime News)



सीआयडी आणि फॉरेन्सिक पथकाकडून तपास


घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी सीआयडी आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केलं. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, मृतदेहाचे काही अवशेष पाळीव कुत्र्याला खाऊ घातल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र या दाव्याला पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. फॉरेन्सिक तपासाचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणातील या दाव्याबाबत अधिक स्पष्टता होणार आहे. (Guwahati Crime News)



पतीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण


दरम्यान, आरोपी पती रमानुष गोस्वामी याने स्वतः दिसपूर पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या संपूर्ण हत्याकांडाचा नेमका घटनाक्रम काय होता, हत्येनंतर पत्नीचं शीर फ्रिजमध्ये का लपवण्यात आलं आणि या प्रकरणामागे आणखी काही कारण होतं का, याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Ahilyanagar : कांद्याने केला वांदा ! शेतातून कांदा आणला म्हणून बहिणीवर हल्ला, सहा जणांविरोधात गुन्हा

Ahilyanagar : शेतातील कांदा आणल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला. सख्ख्या भावाने आधी बहिणीला

Nashik Accident News : त्र्यंबकेश्वरमध्ये कार-दुचाकीची भीषण धडक, २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली-वेळुंजे रस्त्यावर कार आणि दुचाकीची भीषण धडक होऊन २२ वर्षीय तरुणाचा

ASK Private Wealth Hurun India Cheetah Index : भारतातील 'चीता' स्टार्टअप्सची लाट! Hurun India रिपोर्टमध्ये ११० कंपन्यांची बाजी; बेंगळुरू ठरले नंबर १!

मुंबई : भारतातील वेगाने प्रगती करणाऱ्या आणि भविष्यात 'युनिकॉर्न' (Unicorn) बनण्याची क्षमता असलेल्या स्टार्टअप्सची नवी

Bandkhor Movie : ६ जणींचं आयुष्य बदलणारं ते एक बंड! ‘बंडखोर’ चित्रपटाची कथा नेमकी काय? ट्रेलरही भलताच चर्चेत

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत ‘बाईपण भारी देवा’नं सहा बहिणींच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगत प्रेक्षकांच्या मनावर

Mumbai Crime : खारमधील हॉटेलवर पोलिसांचा छापा; पैशांचे आमिष दाखवून महिलेला वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप

मुंबई : खार पश्चिम परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाच्या रॅकेटवर खार पोलिसांनी

Eknath Shinde : पालघरच्या रुग्णालयातील मारहाण प्रकरण : उपमुख्यमंत्री शिंदेच्या आदेशानंतर शिवसेनेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी!

पालघर : पालघरमधील (Palghar News) एका खासगी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आणि तेथे गोंधळ घालणे