Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील स्पर्धा परीक्षेच्या अकादमीमध्ये निवासी शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अकॅडमीचा संस्थापक काशीनाथ रामचंद्र नांगरे (Kashinath Ramchandra Nangre) याला अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणात त्याला बळ देणारी आणि मुलींना धमकावणारी त्याची पत्नी मनीषा काशीनाथ नांगरे (दोघे रा. गोटखिंडी, ता. वाळवा) या दोघांवर आष्टा पोलीस ठाण्यात (Ashta Police Station) पोक्सोसह विविध गंभीर कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापौर रितू तावडे यांनी या मशिनचा त्वरीत वापर करण्याचे दिले निर्देश महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये ही एकमेव मशिन उपलब्ध तरीही ८ वर्षांपासून ...
कुणाला काही सांगू नका, नाहीतर...
मिळालेल्या माहितीनुसार आणि पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, ११ जून २०२६ पासून गोटखिंडी येथील अकादमीत हा संतापजनक प्रकार वारंवार घडत होता. भविष्याची स्वप्न रंगू पाहणाऱ्या या अकादमीत निवासी शिक्षण घेणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तीन अल्पवयीन मुली रात्री झोपेत असताना, संस्थापक काशीनाथ नांगरे याने त्यांच्याजवळ जाऊन लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केला. पीडित मुलींनी हिम्मत करून घडलेल्या प्रकारची माहिती अकॅडमीतील शिक्षिका आणि आरोपीची पत्नी मनीषा नांगरे हिला दिली. मात्र, मुलींना मदत करण्याऐवजी तिने "कोणाला काही सांगू नका, नाहीतर तुमचे शाळेचे नुकसान करेन," अशी थेट धमकी देऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. (Sangli Crime News)
Nashik Crime : नाशिकच्या देवळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. शेतगटाच्या ...
आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अखेर भीतीच्या छायेत असलेल्या पीडित मुलींनी हिंमत दाखवून आपल्या पालकांना घडलेल्या संपूर्ण प्रकारची माहिती दिली. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी तात्काळ आष्टा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. घटना घडल्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी काशीनाथ नांगरे व मनीषा नांगरे यांच्यावर गुन्हा दाखल (Ashta Police Station) केला आहे. लैंगिक अत्याचार व विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी संचालक काशीनाथ रामचंद्र नांगरे (Kashinath Ramchandra Nangre) याला आष्टा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ईश्वरपूर येथील न्यायालयात हजर केले असता १० तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तर पोलिसांनी गुन्हा दाखल करताच मनीषा नांगरे फरार झाली आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. (Sangli Crime News)
मात्र स्पर्धा परीक्षेच्या अकादमीमध्ये घडलेल्या या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.