Tuesday, September 8, 2026

Nashik Accident News : त्र्यंबकेश्वरमध्ये कार-दुचाकीची भीषण धडक, २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : त्र्यंबकेश्वरमध्ये कार-दुचाकीची भीषण धडक, २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Nashik Accident News : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली-वेळुंजे रस्त्यावर कार आणि दुचाकीची भीषण धडक होऊन २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास मोहनबाबा हागोटे वस्ती परिसरात हा भीषण अपघात झाला.

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, इको कार आणि पल्सर मोटरसायकलमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार संदीप काशिनाथ उघडे, (वय २२), याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तातडीने उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघाताप्रकरणी इको चालक महेंद्र काशीद याच्याविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात (Trimbakeshwar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा क्रमांक १५१/२०२६ नोंदवला असून, भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Nashik Accident News)

दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला? वाहनांचा वेग किती होता? याचा पोलीस तपास करत आहेत. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पीआय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >