Gondia Accident News: रोजगाराच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला, गोंदिया- बालाघाट मार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

गोंदिया: गोंदिया- बालाघाट मार्गावरील नागरा- मोहरनटोली परिसरामध्ये भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि पिकअपच्या भीषण धडकेमध्ये जागीच सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. गोंदिया शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्र- मध्यप्रदेश राज्य महामार्गावरील नागरा गावाजवळच घटना घडली आहे. सध्या सर्व जखमींवर जवळच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. (Gondia News)






सोमवारी मध्यरात्री गोंदियाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची कामगारांना नेणाऱ्या पिकअपला समोरून धडक बसली. ट्रकची पिकअपला इतकी जोरदार धडक होती की, या धडकेमध्ये पिकअपचा अक्षरश: चुराडा झाला होता. या जोरदार धडकेमध्ये, सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून सात कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील हे सर्व कामगार रोजगाराच्या शोधामध्ये हैदराबादला जाण्यासाठी निघाले होते. पण कामाच्या शोधात जाणाऱ्या कामगारांसोबत वाटेतच अनर्थ घडला. (Road Accident News)

ट्रक-पिकअपच्या धडकेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तीन वर्षीय बालकाचाही समावेश आहे. ट्रक-पिकअपच्या धडकेमध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांसह गोंदिया ग्रामीण पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सध्या सर्व जखमी प्रवाशांवर गोंदियातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. अपघाताची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली असून पोलीस निरीक्षक वैभव पवार आणि महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैतम यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. (Road Safety)






दरम्यान, अपघात नेमका कोणाच्या

">निष्काळजीपणा
मुळे झाला ? याचा तपास ग्रामीण पोलिसांकडून केला जात आहे. या भीषण अपघातासंदर्भात जखमींच्या जबाबाच्या आधारे, गोंदिया ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात भारतीय दंड संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा क्र. ५२७/२०२६ दाखल केला आहे. (Road Safety News)
Comments
Add Comment

Kartiki Ekadashi 2026: ‘बळीराजाला संकटात वाऱ्यावर सोडणार नाही’; विठुरायाच्या चरणी शिंदेंचे साकडे

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि विठुरायाच्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘ओटीएस’ कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर; लाखो शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ

मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) साठी पात्र

Eknath Shinde : पर्यावरण जनजागृतीसाठी राज्यभर फिरणार 5 विशेष रथ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर : पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लहान वयातच समजावे, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण

PM SVANidhi : PM स्वनिधी पुरस्कार 2026 मध्ये महाराष्ट्राची बाजी; राज्याला 5 राष्ट्रीय पुरस्कार

Maharashtra News: पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी

Food And Drug Administration : FDA ची राज्यभरात मोठी कारवाई; 7 महिन्यांत 152.65 कोटींचा अन्नसाठा जप्त, 1,688 जणांना अटक

मुंबई : राज्यातील अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली

पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा करा, मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

राज्यात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट लक्षात घेता राज्य सरकार आता अलर्ट मोडवर आले आहे. ज्या गावांमध्ये