पुणे: पुणेकरांना ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असताना शहरामध्ये पाणी कपात केली जाणार आहे. शहरातील वेगवेगळ्या जलकेंद्रामध्ये विद्युत पंपिंगची तातडीची देखभाल आणि दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. पुण्यातील संबंधित भागांमध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने माध्यमांना दिली आहे. (Pune News)
पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिस शिपायावर कोयत्याने हल्ला (Koyta Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे रुळांजवळ गांजा ...
पाणी कपातीचा फटका शहरातील अनेक जल शुद्धिकरण केंद्रांना बसणार आहे. शहरातील अनेक महत्त्वाच्या परिसरांना पाणी पुरवठा करणाऱ्या परिसरांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे. शहरातील जल शुद्धिकरण केंद्रामध्ये विद्युत, पंपिंग तसेच स्थापत्यविषयक देखभाल दुरूस्तीची कामे येत्या गुरुवारी, १० सप्टेंबरला हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे पाणी कपात केली जाणार आहे. या सर्व भागाला दुसर्या दिवशी ११ सप्टेंबरला सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती, महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी माहिती दिली आहे. (Pune Water Cut News)
Crime News : गुवाहाटीच्या (Guwahati) हाटीगाव परिसरात पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपीने पत्नीचं शीर धडापासून वेगळं करून ते ...
पर्वती एच.एल.आर टाकी, जनता वसाहत, एस.एन.डी.टी जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी , चांदणी चौक टाकी, लष्कर पाणी पुरवठा आणि वडगाव जलकेंद्र या भागातील पाणीपुरवठा गुरूवारी संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. जल शुद्धिकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीची कामे करणे आवश्यक असल्यामुळे हे काम हाती घेण्यात आले आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच काम सुरु होणार असल्याने गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जगताप यांनी केले आहे. शिवाय, गुरूवारी
&t=8s">कमी दाबाने पाणी पुरवठा होत असताना नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन देखील महापालिकेकडून करण्यात आले. (Water Crisis News)