रेल्वे मालवाहतूक जाळे पूर्ण क्षमतेने सुरू वडोदरा येथील भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट ...
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस आणि अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रभारी ॲड. माधवी नाईक आणि अध्यक्ष विश्वजित गायकवाड यांनी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. उपाध्यक्षपदी अशोक उमरगेकर (पुणे), प्रा.पंडित सूर्यवंशी (लातूर), दिनेश पगारे (नाशिक) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाच्या नवनियुक्त प्रदेश कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या संघटनात्मक नेतृत्वातून अनुसूचित वर्गातील प्रत्येक घटकाचा आवाज अधिक बुलंद होईल आणि समाजाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल. तसेच आपले संघटन कौशल्य आणि… pic.twitter.com/EsioR1Sco8
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) September 7, 2026
सरचिटणीसपदी प्रा.रमा शेजवळ (परभणी), सुधीर जांभूळकर (नागपूर), परिमल कांबळे (अकोला), राहुल कांबळे (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी सिद्धार्थ वानखेडे (अमरावती), बबनराव नरवाडे (छ.संभाजीनगर), प्रणाली सावर्डेकर (रत्नागिरी) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण कांबळे (पुणे) यांची कोषाध्यक्षपदी तर सुरेश गायकवाड (नवी मुंबई) यांची कार्यालय मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पालघर : पालघरमधील (Palghar News) एका खासगी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे आणि तेथे गोंधळ घालणे शिवसेना पदाधिकाऱ्यांना चांगलेच महागात ...
"निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या संघटनात्मक नेतृत्वातून अनुसूचित वर्गातील प्रत्येक घटकाचा आवाज अधिक बुलंद आणि समाजाच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. शिवाय, आपले संघटन कौशल्य आणि सेवाकार्यातून अनुसूचित जाती मोर्चाला अधिक बळ मिळेल.", असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. सोबतच, अनुसुचित जाती मोर्चाच्या जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणींनी नवीन जबाबदारीसाठी रविंद्र चव्हाणांकडून शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत.