Ganesh Idol Workshop : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी राज्यात प्रथमच नवी मुंबईत भव्य ‘महा गणेश मूर्ती कार्यशाळा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शुभारंभ

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश व्यापक प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे नवी मुंबई येथे राज्यातील पहिल्या अशा स्वरूपाच्या ‘पर्यावरणपूरक महा गणेश मूर्ती कार्यशाळा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी याविषयीची माहिती दिली आहे.(Ganesh Idol Workshop)


ही भव्य कार्यशाळा १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे पार पडणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.(Ganesh Idol Workshop)



निसर्ग संवर्धनाचा संदेश आणि पार्श्वभूमी


महाराष्ट्र राज्य आणि देशातील गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा उत्सव असून गणरायाची पूजा म्हणजे प्रत्यक्ष निसर्गाचीच पूजा मानली जाते. गणेशपूजेमध्ये विविध वृक्षांची पाने अर्पण करण्याची आपली जुनी परंपरा आहे. पूर्वी लाल किंवा शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे. मात्र, काळानुरूप प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) च्या मूर्ती आणि रासायनिक रंगांचा वापर वाढल्यामुळे विसर्जनानंतर जलस्रोतांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. पाण्यात शिसे आणि ॲल्युमिनियमसारखे घातक जड धातू मिसळल्यामुळे जलचरांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती करणे गरजेचे बनले आहे.(Ganesh Idol Workshop)


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील ‘मन की बात’ कार्यक्रमातून नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. याच मोहिमेला पुढे नेण्याच्या उद्देशाने एकाच ठिकाणी हजारो विद्यार्थी आणि नागरिकांना एकत्र आणून शाडूच्या किंवा मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक मूर्तींचा हा संदेश थेट घराघरांपर्यंत आणि मोठ्या प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचेल, असा ठाम विश्वास पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.(Ganesh Idol Workshop)



विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग


या कार्यशाळेत ठाणे, पनवेल, खारघर, उलवे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील शाळांमधील सुमारे साडेपाच ते सहा हजार शालेय विद्यार्थी व नागरिक एकाच वेळी सहभागी होणार आहेत. तज्ज्ञ मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व विद्यार्थी आणि नागरिक स्वतः पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारणार आहेत. याद्वारे वर्षभरातील सर्व सण व उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत, हा मुख्य उद्देश आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे गेल्या दोन दशकांपासून अशा प्रकारची व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी विविध स्पर्धा व उपक्रमही आयोजित केले जातात. या राज्यस्तरीय पहिल्याच उपक्रमामुळे राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि शैक्षणिक संस्थांनाही अशा पद्धतीच्या कार्यशाळा आयोजित करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळेल.(Ganesh Idol Workshop)



मान्यवरांची विशेष उपस्थिती


या महत्त्वकांक्षी कार्यशाळेच्या शुभारंभ सोहळ्यास अनेक दिग्गज नेते व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील आणि उपमहापौर दशरथ भगत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत.(Ganesh Idol Workshop)

Comments
Add Comment

Pune Land Scam : मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना आरोपी का केले नाही? उच्च न्यायालयाचा पोलीस महासंचालकांना सवाल; दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

मुंबई : मुंढवा जमीन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना आरोपी का करण्यात आले

मुंबईत लाडक्या गणरायाची तयारी अंतिम टप्प्यात, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घेतला तयारीचा आढावा

मुंबई: लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवसच शिल्लक असताना आता महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची लगबग अंतिम

Chandrakant Patil : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेशी संबंधित दुर्मिळ दस्तऐवजांचा नवीन खंड २० ऑक्टोबर रोजी होणार प्रकाशित

Mumbai : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे घेतलेल्या ऐतिहासिक बौद्ध धम्मदीक्षेशी संबंधित दुर्मिळ

Infrastructure Projects : रस्ते, रेल्वे, सागरी मार्ग, बंदरांसाठी पर्यायी वनीकरणाची जमीन शोधण्याची चिंता मिटणार; राज्यात दरवर्षी ५ हजार हेक्टर पर्यायी वनीकरणाची गरज

पायाभूत प्रकल्पांसाठी ४० हजार हेक्टरची ‘लँड बँक’ मुंबई : पायाभूत विकास प्रकल्पांसाठी वनजमीन वळतीकरणाची

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर; १३ आणि १४ सप्टेंबरला विविध कार्यक्रम

एशियाटिक सोसायटी, हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) १३ आणि १४

DevendraFadnavis : एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

मुंबई : डिजिटल वित्तीय क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक,