Anna Bansode : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वास्तूंची जतन-संवर्धन कामे दर्जेदार करावीत; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले निर्देश

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई’ अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या जतन व संवर्धनाची कामे सुनियोजित, दर्जेदार आणि या वास्तूंच्या ऐतिहासिक महत्त्वाला साजेशी व्हावीत, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.



पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी सामाजिक न्याय विभागाने मंजूर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या विशेष निधीच्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सोसायटीच्या माध्यमातून राज्यातील नऊ शैक्षणिक संस्था व दोन वसतिगृहाचे जतन व संवर्धनाच्या कामांचा व प्रशासकीय मान्यतेचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.(Anna Bansode)


यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव सो. ना. बागूल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सह सचिव पु. प्र. साबणे, वित्त विभागाच्या अवर सचिव शि. भा. भोगटे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. वासुदेव गाडे व चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते. 


विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. ज्या कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, त्या प्रस्तावांना प्राधान्याने मान्यता देण्याची कार्यवाही शासनस्तरावर करावी. सामाजिक न्याय विभागाने कामांच्या स्वरुपानुसार मंजूर निधी आणि प्रशासकीय मान्यतेबाबतची माहिती तसेच इतर अनुषंगिक बाबींसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीशी समन्वय साधावा. तसेच शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहांच्या नियोजित कामांचा सद्यस्थिती अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, असे निर्देश बनसोडे यांनी दिले.(Peoples Education Society)



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे हा ऐतिहासिक वारसा आहे. या वास्तूंच्या संवर्धनाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सदैव प्रेरणा आणि मार्गदर्शन देत राहील. ऐतिहासिक संदर्भांच्या दृष्टीनेही या इमारतींना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभाग आणि संस्थांनी समन्वयातून जतन व संवर्धनाची कामे करावीत, अशा सूचनाही विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी दिल्या.(Anna Bansode)

Comments
Add Comment

Breaking : भांडुप स्थानकात ट्रॅक ओलांडताना एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी अंत

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सकाळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

मुंबईत आठवड्यातून एक दिवस बांधकामे बंद ठेवा; वायुप्रदूषण रोखण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांची महापालिका आयुक्तांना सूचना

मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी संपूर्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस

लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावणे किंवा बोलणे पडणार महाग!

रेल्वेतून प्रवास करताना मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, व्हिडिओ पाहणे किंवा मोठ्याने फोनवर गप्पा मारणे

Mumbai Crime: पत्नीशी वाद अन् बाळाला स्कायवॉकवरून फेकल्याचा आरोप; पिता अटकेत

मुंबई : मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पत्नीशी झालेल्या

Attack on Tiger Shroff : टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी ११ वा आरोपी अटकेत; ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी ११ व्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. प्रांजल ठकराल (वय 22) असे

Central Railway Delayed Today : मुंबई लोकलचा बोजवारा! ओव्हरहेड वायरला आग अन् रिले रूममधील धुरामुळे मध्य रेल्वे विस्कळीत; संतापलेल्या प्रवाशांची रुळांवरून पायपीट

मुंबई : सोमवारी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिवस अतिशय मनस्तापाचा ठरला. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य