Fintech India : फिनटेकमध्ये भारताची प्रगती थक्क करणारी!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्राला ‘टोकनाइज्ड’ राज्य बनविण्याच्या दिशेने पुढची पायरी


मुंबई : फिनटेक क्षेत्रात भारताने केलेली प्रगती थक्क करणारी असून, यूपीआयसारख्या तंत्रज्ञानामुळे डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात देशाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. जिओ वर्ल्ड सेंटर येथे सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारताच्या डिजिटल व्यवहारातील प्रगतीबरोबरच महाराष्ट्राच्या ‘टोकनाइज्ड राज्य’ होण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ( Fintech India)


“फिनटेकमध्ये आज देशाची राजधानी मुंबई आहे,” असे सांगत फडणवीस (Maharashtra CM) म्हणाले की, भारताने फिनटेक क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. यूपीआयसारखे तंत्रज्ञान जगातील सर्वाधिक व्यवहार करणाऱ्या तंत्रज्ञानांपैकी एक ठरले असून, जगातील अनेक देश आता भारताच्या डिजिटल व्यवहारांकडे लक्ष देत आहेत. डिजिटल व्यवहारांमुळे वित्तीय संस्था आणि कर्ज देणाऱ्या संस्थांचा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोच वाढला असून, विविध आर्थिक सेवांचा प्रवेशही अधिक सुलभ झाला आहे.



मागील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये महाराष्ट्र हे देशातील पहिले ‘टोकनाइज्ड’ राज्य करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या दिशेने गेल्या वर्षभरात मोठी प्रगती झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राने ‘डेल्टा ॲक्ट’ तयार केला असून, या कायद्याचे संपूर्ण पुनरावलोकन करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर सामान्य नागरिकाला आपल्या जमिनीच्या मूल्याचा उपयोग करून त्यातून तरलता निर्माण करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्राला फिनटेक आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या पुढील टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.( Digital Maharashtra) 


सुरक्षित डिजिटल पेमेंटवर भर


यूपीआय व्यवहारांसाठी एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांसह विविध पर्याय आणि यंत्रणांचा वापर वाढत असताना डिजिटल पेमेंटची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. सध्याचे व्यवहार डिजिटल पेमेंट गेटवेमधून होत असून, ही गेटवे सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला. या क्षेत्रात सुरू असलेले संशोधन आणि नवोन्मेष भविष्यातील संभाव्य धोक्यांवर मात करण्यास मदत करतील, असेही त्यांनी सांगितले. फिनटेक क्षेत्रातील भारताची झपाट्याने झालेली प्रगती ही देशासाठी महत्त्वाची उपलब्धी असून, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फडणवीस यांनी आभार मानले. ( Financial Technology)

Comments
Add Comment

Shreyas Talpade On DJ Ban: 'सण साजरे करायला पाहिजे, पण...', डीजे बंदीवर मराठमोळ्या अभिनेत्याचं रोखठोक उत्तर

मुंबई: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना सध्या महाराष्ट्रामध्ये ध्वनी प्रदूषणाचा

Ganeshotsav 2026 : कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा; 11 सप्टेंबरपासून टोल पूर्णपणे माफ

मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठा

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गणेशमूर्तीच्या वाहनाला टँकरची धडक; 4 जण जखमी

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी सकाळी गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनाला सिमेंटच्या टँकरने मागून

BMC : मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना मिळणार १ कोटींचा निधी?

नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची निधीचा ठराव सभागृहात मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Mumbai Chicken Shops : मुंबईतील सर्व कोंबडी विक्रेत्यांच्या दुकानांची होणार तपासणी?

अनधिकृत असल्यास होणार कारवाई, महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील सर्व कोंबडी

Worli Century Mill : वरळीतील सेंच्युरी मिल, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड तसेच सेव्हन हिल्स रुग्णालय भाडेतत्वावर देण्याचे प्रस्ताव मंजूर

महापालिका सभागृहात विरोधकांनी गोंधळ, महापौरांनी प्रस्तावांना दिली मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी): वरळीतील