Nashik : गणेशोत्सवाआधी नाशिकचे रस्ते होणार खड्डेमुक्त ! आयुक्तांचे विभागांना कडक आदेश

Nashik : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहे आणि याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. गणेश मंडळांच्या मिरवणुका ज्या रस्त्यांवरून जाणार आहेत, त्या रस्त्यांवरील खड्डे आता तातडीने बुजवले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी विविध विभागांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी मंगळवारी (दि. ८) परिपत्रक जारी करून विविध विभागांना जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या.



आयुक्तांचे विभागांना कडक आदेश


प्रमुख चौक, बाजारपेठा आणि मिरवणूक मार्ग खड्डेमुक्त करण्यासोबतच रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे आणि परिसराची स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात गर्दी आणि मिरवणुका होणार असल्याने रस्त्यांवर पाणी साचणार नाही, ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येणार नाही आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.यापूर्वी आयुक्तांनी विभागप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला.


गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्या एकाच खिडकीतून तातडीने देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. मिरवणूक मार्गावरील विद्युत तारा आणि इतर केबल्स वाहतुकीला अडथळा ठरत असतील तर त्या हटवण्याची जबाबदारी संबंधित विभागांवर देण्यात आली आहे. उत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठीही यंत्रणा सज्ज ठेवली जाणार आहे. यासोबतच शहरात कचऱ्याचे ‘ब्लॅक स्पॉट’ निर्माण होऊ नयेत, यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे. मुख्य बाजारपेठांमध्ये दिवसातून दोन वेळा साफसफाई, विविध ठिकाणी निर्माल्य कलश आणि गणेश विसर्जनासाठी विसर्जन कुंड तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



अतिक्रमणांवरही कारवाई


मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमधील रस्ते तसेच फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी नियमित मोहीम राबवली जाणार आहे. विनापरवाना फलक, होर्डिंग्ज आणि पताकांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गणेशोत्सव काळात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि दूषित पाण्याच्या तक्रारींचं तातडीने निराकरण व्हावं, यासाठीही महापालिका यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश आहेत. तर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन विभागाची यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आलं आहे. आता महापालिकेच्या या आदेशानंतर गणेशोत्सवापूर्वी नाशिकचे रस्ते खरोखरच खड्डेमुक्त होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Apple Mega Event 2026 : आज रात्री iPhone 18 Pro आणि पहिल्या फोल्डेबल iPhone Duo वरून अखेर पडदा उठणार ?

कुपर्टिनो (कॅलिफोर्निया) येथील प्रसिद्ध 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये ॲपलच्या भव्य सोहळ्याची पूर्ण तयारी झाली आहे.

Shambhuraj Desai : एकेरी, शिवराळ भाषेमुळे जरांगेंच्या आंदोलनाची दिशा बदलली

- मंत्री शंभूराज देसाई; टीका करण्यापेक्षा सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी

'सण साजरे करायला पाहिजे, पण...', डीजे बंदीवर मराठमोळ्या अभिनेत्याचं रोखठोक उत्तर

मुंबई: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना सध्या महाराष्ट्रामध्ये ध्वनी प्रदूषणाचा

Fintech India : फिनटेकमध्ये भारताची प्रगती थक्क करणारी!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्राला ‘टोकनाइज्ड’ राज्य बनविण्याच्या दिशेने पुढची पायरी मुंबई : फिनटेक

DCM Eknath Shinde News: लंडनऐवजी झ्युरिकला विमान उतरले, हिथ्रो विमानतळावरील तांत्रिक बिघाडाचा एकनाथ शिंदेंच्या अधिकाऱ्यांना फटका

मुंबई: लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाचा फटका महाराष्ट्राचे

Jalgaon Crime : २०० रुपयांची लाच भोवली ! जामनेरचा लाचखोर भूकरमापक दुसऱ्यांदा जाळ्यात

Jalgaon Crime : एका घटनेनंतर धडा घेईल अशी अपेक्षा असताना जामनेरचा लाचखोर भूकरमापक १४ वर्षानंतर पुन्हा जाळ्यात अडकला आहे.