Nashik : प्रा. सोपान बोरसे मृत्यूप्रकरणी उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Malegaon : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिक्षण विभागाची चौकशी समिती तपासणीसाठी आली असताना ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक सोपान खंडेराव बोरसे यांची प्रकृती अचानक बिघडून त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून आता या प्रकरणात नाशिकचे शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्यासह पाच अधिकाऱ्यांविरुद्ध येथील शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नेमकं प्रकरण काय ?


महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था संचलित म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील कथित गैरकारभार व अनियमिततेच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शासनाने तेथे प्रशासकाची नियुक्ती केली आहे. याच अनुषंगाने तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे चार सदस्यीय पथक मंगळवारी दुपारी शाळेत आले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगळवारी सकाळी अकरावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना नाशिक पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटोळे यांच्यासह चार अधिकाऱ्यांचं पथक शाळेत चौकशीसाठी दाखल झालं होतं.



अधिकाऱ्यांकडून शिक्षकांशी अरेरावीची वागणूक


यावेळी परीक्षा सोडून बोरसे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं, शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांकडून शिक्षकांशी अरेरावीची वागणूक देण्यात आली. याचदरम्यान वर्गात परीक्षा घेत असलेल्या प्राध्यापक सोपान बोरसे यांना तातडीने कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं. बोरसे कार्यालयात पथकासमोर पोहोचले आणि काही वेळातच अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कार्यालयातच कोसळले. उपस्थित शिक्षकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.


गेल्या दोन वर्षांपासून चौकशांच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडून शाळांना नाहक त्रास दिला जात असून याच तणावामुळे बोरसे यांचा बळी गेल्याचा आरोप करत शिक्षक व बोरसे यांच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. प्राध्यापक बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्राही शिक्षकांनी घेतला होता. यानंतर अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची भेट घेतली. या घटनेची सखोल चौकशी करून दोष आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्यानंतर शिक्षकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.



उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल


मयत बोरसे यांचे भाऊ प्रवीण बोरसे (रा. वजीरखेडे) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. १ मे २०२६ पासून शाळेवर प्रशासक म्हणून नियुक्त असलेले मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी तानाजी घोंगडे हे वारंवार चौकशीच्या नावाखाली शाळेत येऊन प्रा.सोपान बोरसे यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत अरेरावीची भाषा वापरत होते, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीनुसार नाशिक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, शिक्षण उपसंचालक संजय राठोड, शाळेचे प्रशासक तानाजी घोंगडे, नाशिक पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटोळे यांच्यासह तपास पथकातील अन्य सदस्यांविरोधात याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Apple Mega Event 2026 : आज रात्री iPhone 18 Pro आणि पहिल्या फोल्डेबल iPhone Duo वरून अखेर पडदा उठणार ?

कुपर्टिनो (कॅलिफोर्निया) येथील प्रसिद्ध 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये ॲपलच्या भव्य सोहळ्याची पूर्ण तयारी झाली आहे.

Shambhuraj Desai : एकेरी, शिवराळ भाषेमुळे जरांगेंच्या आंदोलनाची दिशा बदलली

- मंत्री शंभूराज देसाई; टीका करण्यापेक्षा सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी

'सण साजरे करायला पाहिजे, पण...', डीजे बंदीवर मराठमोळ्या अभिनेत्याचं रोखठोक उत्तर

मुंबई: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना सध्या महाराष्ट्रामध्ये ध्वनी प्रदूषणाचा

Fintech India : फिनटेकमध्ये भारताची प्रगती थक्क करणारी!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्राला ‘टोकनाइज्ड’ राज्य बनविण्याच्या दिशेने पुढची पायरी मुंबई : फिनटेक

Nashik : गणेशोत्सवाआधी नाशिकचे रस्ते होणार खड्डेमुक्त ! आयुक्तांचे विभागांना कडक आदेश

Nashik : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहे आणि याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. गणेश

DCM Eknath Shinde News: लंडनऐवजी झ्युरिकला विमान उतरले, हिथ्रो विमानतळावरील तांत्रिक बिघाडाचा एकनाथ शिंदेंच्या अधिकाऱ्यांना फटका

मुंबई: लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाचा फटका महाराष्ट्राचे