Nashik News : चौकशीच्या तणावात प्राध्यापकांचा मृत्यू ? अधिकाऱ्यांसमोरच हृदयविकाराचा झटका

Nashik News : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिक्षण विभागाची चौकशी समिती तपासणीसाठी आली असताना ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक सोपान खंडेराव बोरसे (५२, रा. वझिरखेडे, मालेगाव) यांची प्रकृती अचानक बिघडून त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.



नेमकं काय घडलं ?


मंगळवारी सकाळी अकरावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना नाशिक पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटोळे यांच्यासह चार अधिकाऱ्यांचं पथक शाळेत चौकशीसाठी दाखल झालं होतं. यावेळी परीक्षा सोडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं, शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांकडून शिक्षकांशी अरेरावीची वागणूक देण्यात आली. याचदरम्यान वर्गात परीक्षा घेत असलेल्या प्राध्यापक सोपान बोरसे यांना तातडीने कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं. बोरसे कार्यालयात पथकासमोर पोहोचले आणि काही वेळातच अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कार्यालयातच कोसळले. उपस्थित शिक्षकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.



‘चौकशीच्या मानसिक त्रासामुळे मृत्यू’चा आरोप


दरम्यान, प्राध्यापक बोरसे यांचा मृत्यू हा चौकशीच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या मानसिक त्रासामुळे झाल्याचा गंभीर आरोप शिक्षक आणि प्राध्यापक संघटनांनी केला आहे. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, या शाळेची यापूर्वीही चौकशी करण्यात आली होती. चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रं अधिकाऱ्यांना देण्यात आली होती आणि शिक्षकांकडूनही सहकार्य करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही वारंवार चौकशी पथक पाठवून शिक्षकांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे, प्राध्यापक बोरसे यांची यापूर्वी चार वेळा चौकशी झाली होती, असा दावा शिक्षकांनी केला आहे.



शिक्षकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या


या घटनेनंतर संतप्त शिक्षक, प्राध्यापक आणि सेवकांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं. प्राध्यापक बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्राही शिक्षकांनी घेतला होता. यानंतर अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची भेट घेतली. या घटनेची सखोल चौकशी करून दोष आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्यानंतर शिक्षकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.


दरम्यान, प्राध्यापक बोरसे यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय? चौकशीदरम्यान नेमकं काय घडलं? आणि अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांमध्ये तथ्य आहे का? याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. एका प्राध्यापकाचा चौकशीदरम्यान अचानक मृत्यू झाल्याने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिककरांनो सावधान ! मोबाईल टॉवर बसवून दरमहा २५ ते ५० हजार रुपयांचे आमिष ; बनावट ऑफरद्वारे फसवणुकीचा इशारा

Nashik : गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. अशातच आता मोबाईल टॉवर बसवून हजारो रुपयांचे

Animal Cruelty Case : गोवंडीत क्रूरतेचा कळस! सराईत मांजर मारेकऱ्याचा शोध सुरू, माहिती देणाऱ्याला घसघशीत बक्षीस

मुंबई : मुंबईतील गोवंडी परिसरात एकाच भागात अवघ्या काही दिवसांच्या अंतराने सहा मुक्या मांजरांच्या निर्घृण

Apple Mega Event 2026 : आज रात्री iPhone 18 Pro आणि पहिल्या फोल्डेबल iPhone Duo वरून अखेर पडदा उठणार ?

कुपर्टिनो (कॅलिफोर्निया) येथील प्रसिद्ध 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये ॲपलच्या भव्य सोहळ्याची पूर्ण तयारी झाली आहे.

Shambhuraj Desai : एकेरी, शिवराळ भाषेमुळे जरांगेंच्या आंदोलनाची दिशा बदलली

- मंत्री शंभूराज देसाई; टीका करण्यापेक्षा सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी

'सण साजरे करायला पाहिजे, पण...', डीजे बंदीवर मराठमोळ्या अभिनेत्याचं रोखठोक उत्तर

मुंबई: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना सध्या महाराष्ट्रामध्ये ध्वनी प्रदूषणाचा

Fintech India : फिनटेकमध्ये भारताची प्रगती थक्क करणारी!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्राला ‘टोकनाइज्ड’ राज्य बनविण्याच्या दिशेने पुढची पायरी मुंबई : फिनटेक