Nashik : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांसह स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) सार्वजनिक आरोग्य व मलेरिया विभागामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. दि. १० ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत शहरातील विविध भागांत घरोघरी विशेष सर्वेक्षण करण्यात येणार असून, ३०० हून अधिक पथके नागरिकांच्या घरी पोहोचून आरोग्य तपासणी तसेच डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याची कार्यवाही करणार आहेत. (Nashik News)
Nashik : नाशिक शहरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वातावरण बदलांमुळे नाशिक शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यू (Dengue) आणि मलेरियाच्या (Malaria) ...
डेंग्यू, मलेरिया व स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी मनपाची विशेष मोहीम
पावसाळ्यानंतर साथीचे व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. जून महिन्यानंतर डेंग्यू आणि स्वाईन फ्लूच्या (Dengue and Swine Flu) रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी मनपाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक गती दिली आहे. शहरातील प्रत्येक आरोग्यवर्धिनी केंद्रनिहाय विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमध्ये आशासेविका, बहुउद्देशीय आरोग्य सेवक, ए.एन.एम. यांच्यासह मनपाच्या कीटक नियंत्रण विभागातील कंत्राटी कामगार व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांमार्फत आरोग्यवर्धिनी केंद्र व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील घरे, रस्ते, वसाहती, कॉलनी तसेच परिसराचे आरोग्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणादरम्यान तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांच्या आरोग्यस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी रुग्णालयात संदर्भित करण्यात येणार आहे.(Nashik News)
कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी घरांची तपासणी करून साचलेले पाणी, विविध प्रकारचे पाणीसाठे आणि डासांची उत्पत्ती होण्याची संभाव्य ठिकाणे शोधून ती तातडीने रिकामी करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. ज्या ठिकाणी पाणीसाठा रिकामा करणे शक्य नाही, तेथे आवश्यकतेनुसार अबेटिंगची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी फॉगिंग, जंतूनाशक फवारणी आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याच्या कार्यवाहीला वेग देण्यात येणार आहे. (Nashik News)
Minister Girish Mahajan : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. केवळ वृक्षारोपण ...
दैनंदिन अहवाल मनपा मुख्यालयात सादर करण्याचे निर्देश
विशेष मोहिमेदरम्यान करण्यात आलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल विहित नमुन्यात तयार करून दररोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत मनपा मुख्यालयात सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर नियमित देखरेख ठेवण्यात येणार आहे. डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारे पाणीसाठे अथवा अस्वच्छता आढळल्यास संबंधितांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या सूचना देण्यात येतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.