Nashik News : नाशिककरांनो तब्येत सांभाळा ! दहा दिवसांत ६६ जणांना स्वाइन फ्लूची लागण, आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली

Nashik : नाशिक शहरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वातावरण बदलांमुळे नाशिक शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यू (Dengue) आणि मलेरियाच्या (Malaria) रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच स्वाइन फ्लूचे रुग्णही वाढत असल्याने शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. स्वाइन फ्लूच्या (Swine Flu) रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. मागील दहा दिवसांत तब्बल ६६ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची धकाकदायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरात दररोज सरासरी सहा रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंतेत भर पडली आहे. (Nashik News)



स्वाइन फ्लूमुळे तीन जणांचा मृत्यू


मागील महिनाभरात स्वाइन फ्लूमुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील दोन रुग्ण (Patient) ग्रामीण भागातील, तर एक रुग्ण नाशिक शहर हद्दीतील असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिका आरोग्य विभागाने नाशिक रोड (Nashik Road) येथील बिटको रुग्णालय आणि पंचवटीतील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्रत्येकी दहा खाटांचे स्वाइन फ्लू कक्ष तयार केले आहेत. मात्र, या कक्षांमध्ये उपचार घेण्याऐवजी अनेक रुग्ण खासगी रुग्णालयांना प्राधान्य देत असल्याने महापालिकेचे हे कक्ष सध्या रिकामेच असल्याचे चित्र आहे. (Nashik News)



लक्षणे दिसताच तपासणी करा


दरम्यानमी ताप, सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे दिसल्यास तो आजार अंगावर न काढता तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्या. स्वाइन फ्लूची लक्षणे जाणवल्यास विलंब न करता उपचार सुरू करणे गरजेचे आहे, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Minister Girish Mahajan : 'एक विद्यार्थी, एक वृक्ष'चा संकल्प; हरित नाशिकसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा - पालकमंत्री गिरीश महाजन

Minister Girish Mahajan : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि हरित ठेवण्यासाठी

गणेशोत्सव २०२६ : खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रयत्नांना यश! वसई-विरार महापालिकेकडून विसर्जन जेट्टीसह विशेष सुविधांची घोषणा

पालघर : पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा (Hemant Sawra) यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक

Manoj Jarange News: मनोज जरांगे यांच्या १५ पैकी १२ मागण्या मान्य, सरकारकडून जरांगे यांना उपोषण स्थगित करण्याचे आवाहन

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या १५ मागण्यांपैकी १२ मागण्या सरकारने

Jalgaon Accident News : जळगावात भरधाव कंटेनर पलटी, तरुणाचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News : पाळधी ते तरसोद बायपासवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा अचानक ताबा सुटला आणि काही क्षणांतच कंटेनर

Nashik : कुंभमेळ्याच्या दर्शनपथासाठी पशुवैद्यकीय दवाखानाही हटणार ! जागा न मिळाल्याने ७ किमी दूर अंजनेरीला स्थलांतर

Nashik : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं सुरू आहेत पण या विकासकामांचा फटका

Gaurav Bhatia : CJP ला मोठा झटका! AI जनरेटेड फेक फोटो भोवला; भाजपच्या गौरव भाटियांचा २ कोटींचा मानहानीचा खटला!

नवी दिल्ली : युवा आणि 'Gen Z' राजकारणाचा दावा करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (Chockroach Janta Party) अडचणीत मोठी वाढ झाली आहे.