मुंबई : ‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या चालकांची संपूर्ण माहिती परिवहन विभागाकडे सादर करावी. चालकांची ओळख, वास्तव्य तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून पात्र चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी मंडळा’ चे सदस्यत्व देण्यात येणार आहे. यासाठी चालकांचे डोमिसाइल प्रमाणपत्र तसेच आवश्यक ती सर्व माहिती तीन महिन्यांच्या कालावधीत सादर करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.(Pratap Sarnaik)
‘महाराष्ट्र ॲग्रीगेटर धोरण २०२६’च्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे तसेच भारत टॅक्सी, रॅपिडो, उबर, ओला, शालिनी कॅब आणि सिटीफ्लो या ॲपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.(Pratap Sarnaik)
पालघर : पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा (Hemant Sawra) यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav 2026) मंडळांसाठी विशेष ...
ॲपआधारित टॅक्सी सेवांमध्ये कार्यरत चालकांना कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. चालक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कामगार कायद्यानुसार उपलब्ध असलेल्या विविध सेवा-सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.(Pratap Sarnaik)
मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले या आपल्या उत्साह, ऊर्जा आणि सदैव तरुण वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जात होत्या. नव्वदीच्या दशकातही मंचावर ...
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकांची ओळख आणि वास्तव्याची खात्री होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित चालकांचे डोमिसाइल प्रमाणपत्र सादर करणे, व्यवहारिक मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार असून, पात्र चालकांना परिवहन विभागाकडून बॅज देण्यात येईल. तसेच त्यांना कल्याणकारी मंडळाचे सदस्यत्व देऊन त्यांच्या कुटुंबीयांनाही मंडळाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
ॲग्रीगेटर धोरणानुसार चालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच प्रवाशांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने विचारात घ्यावी. अपघात तसेच गुन्हेगारीच्या घटना टाळण्यासाठी चालकांच्या अर्जांची आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.(Pratap Sarnaik)
Jalgaon Accident News : पाळधी ते तरसोद बायपासवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा अचानक ताबा सुटला आणि काही क्षणांतच कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. या भीषण अपघातात ...
संबंधित ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांना चालकांची आवश्यक माहिती संकलित करून परिवहन विभागाकडे सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत चालकांची संपूर्ण माहिती, डोमिसाइल प्रमाणपत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.(Pratap Sarnaik)