Thursday, September 10, 2026

Young DSA Bigg Boss 20 : गुल्लू आणि आसिफला मागे टाकत 'यंग डीएसए' ठरला ‘बिग बॉस 20’चा पहिला कॅप्टन

Young DSA Bigg Boss 20 : गुल्लू आणि आसिफला मागे टाकत 'यंग डीएसए' ठरला ‘बिग बॉस 20’चा पहिला कॅप्टन

मुंबई : ‘बिग बॉस सीझन 20’च्या घरात पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमध्ये रंगतदार खेळ सुरू झाला आहे. तब्बल १६ सदस्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर टास्क, वाद-विवाद आणि मनोरंजनाची चांगलीच मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात चार स्पर्धक नॉमिनेशनच्या फेऱ्यात अडकले असून, यापैकी कोणाचा घरातील प्रवास संपणार याची उत्सुकता वाढली आहे. मात्र, एलिमिनेशनचा निकाल समोर येण्यापूर्वीच बिग बॉसच्या घराला पहिला कॅप्टन मिळाला आहे. आता प्रश्न एकच घराची सूत्रं नेमकी कोणाच्या हाती गेली? कोण ठरलाय बिग बॉस 20चा पहिला कॅप्टन? (Young DSA Bigg Boss 20)

बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रचंड राडा झाला होता. तिघांमध्ये कॅप्टन्सीसाठी चुरशीची लढत रंगली होती. कॅप्टन्सीसाठी गुल्लू, आसिफ खान आणि यंग डीएसए यांच्यात लढत रंगली होती. दरम्यान, तिघांमधून 'बिग बॉस सिझन 20' चा पहिला कॅप्टन यंग डीएसए बनला आहे, अशी माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हर्ष मचारे उर्फ ​​यंग डीएसए हा 'बिग बॉस सिझन 20'च्या घरातील पहिला कॅप्टन बनला आहे. 'घरात कॅप्टनसीच्या एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे!', असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.(Young DSA Bigg Boss 20)

कॅप्टन्सीसाठी तीन उमेदवार ठरलेले असतात. इतर सदस्यांना टास्क दिला जातो. पॉपकॉर्न बकेटमध्ये पॉपकॉर्न गोळा करायचे, तसेच कॅप्टन्सीसाठी उभे असलेल्या तिघांपैकी एकाच्या बकेटमध्ये टाकायचे. याचा एक प्रोमोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये काझी आणि आसिफ यांच्यात भांडण झालं असल्याचं पाहायला मिळालं. दोघांमधील परिस्थिती अधिक चिघळू लागते. दोघांनीही इतर स्पर्धक शांत करण्याचा प्रयत्न करतात. आसिफला स्काऊट शांत राहण्यासाठी सांगतो. दरम्यान, या भांडणाचा निकाल 'विकेंट का वार'मध्ये लागणार एवढं मात्र नक्की. 'विकेंट का वार'मध्ये नेमकं काय घडणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. (Young DSA Bigg Boss 20)

पहिल्या आठवड्यात एकूण ४ स्पर्धकांना इतर सदस्यांच्या तुलनेत जास्त व्होट्स मिळाले. त्यामुळे या चार सदस्यांवर एलिमिनेशची टांगती तलवार आहे. लव गिल, उदिती सिंह, अरिशफा खान आणि कनिका मान यांपैकी एका स्पर्धकाला कमी व्होट मिळाल्यामुळे घरातून बेघर व्हावं लागू शकतं. (Young DSA Bigg Boss 20)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >